Train stunt Video: आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा स्टंटबाजी करताना पाहिली असेल; पण ते स्टंट खूप काळजी घेऊन केले जातात. सिनेमाची गोष्ट सोडली, तर आता अनेक जण प्रत्यक्षात प्रसिद्धी, सोशल मीडियावरील काही व्ह्युज, लाइक्ससाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात आणि स्टंट करतात. हे स्टंट पाहून अनेकदा आपल्याच अंगावर काटा येतो. या स्टंटबाजीमध्ये अनेकदा त्यांचा जीवदेखील जातो. सध्या ट्रेनला लटकून असाच जीवघेणा स्टंट एका तरुणाने केलाय आणि हा स्टंट त्याच्या अंगलट आला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरुणाचा स्टंट आला अंगलट

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण वेगाने जाणाऱ्या ट्रेनच्या खिडकीच्या बाहेरच्या बाजूला लटकताना दिसतोय. स्टंट अंगलट आल्याने आपला जीव वाचवण्यासाठी त्याने दुसऱ्या प्रवाशाचा हात धरला आहे. १:१० सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये तो तरुण ५६ सेकंदांसाठी त्या दुसऱ्या प्रवाशाचा हात धरून वेगाने येणाऱ्या ट्रेनच्या बाहेर लटकत असल्याचे दिसून येत आहे.

सुदैवाने, थो़ड्याच वेळात ट्रेन थोडी स्लो होते. ट्रेन स्लो होताच तरुण खाली पडतो. पण मोठी दुर्घटना होण्यापासून टळते. तो लगेच उठतो आणि ट्रेनमध्ये चढतो. पण, जर ट्रेन थांबली नसती किंवा तो माणूस वेगाने येणाऱ्या ट्रेनमधून पडला असता तर हा स्टंट प्राणघातक ठरू शकला असता.

व्हिडीओची लिंक

https://twitter.com/bstvlive/status/1899052249156055386

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ उत्तर प्रदेश (यूपी) मधील असल्याचे सांगितले जात आहे आणि ट्रेन कासगंजहून कानपूरला जात असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांची कारवाई

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @bstvlive या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून @adgzonekanpur या एक्स अकाउंटवरून रिप्लाय देत कानपूर झोनच्या एडीजींनी सरकारी रेल्वे पोलिस यूपी (जीआरपी) ला टॅग केले आणि त्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जीआरपी यूपीने एसपी जीआरपी आग्रा यांना टॅग केले आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.

एसपी जीआरपी आग्रा यांनी तातडीने प्रतिसाद दिला आणि सांगितले की जीआरपी फर्रुखाबाद पोलिस स्टेशनला आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तथापि, या प्रकरणात कोणत्याही पोलिस कारवाईचे वृत्त नाही.