Train Viral Video: आरामदायी आणि स्वस्तात मस्त प्रवासासाठी अनेक जण ट्रेनचा पर्याय निवडतात. कारण ट्रेनमधील प्रवासात सर्व सोयी-सुविधा मिळतात. पण, अनेकदा प्रवासादरम्यान अशा काही घटना घडतात ज्या कायम लक्षात राहतात. ट्रेनमधून प्रवास करताना काहीवेळा अडचणींचा सामना करावा लागतो. कधी बसायला सीट मिळत नाही, सीट मिळाली तर आणखी काही दुसरा त्रास असतो. अशावेळी लोक हटके जुगाड शोधून सुखरुप प्रवास करताना दिसतात. सध्या ट्रेनमधील जबरदस्त जुगाडचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून सर्वच आश्चर्य व्यक्त करत आहेत.

ट्रेनमधील या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एका कंपार्टमेंटमधील खराब दरवाजातून येणाऱ्या सततच्या आवाजामुळे त्या कंपार्टमेंटमध्ये असलेले प्रवासी वैतागले. यावेळी त्यांनी दरवाजावर चक्क झोपण्याची उशी बांधून त्या आवाजापासून सुटका करून घेतली.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक्स्प्रेस ट्रेनमधील एका कंपार्टमेंटमध्ये काही प्रवासी झोपले आहेत. मात्र, या कंपार्टमेंटचा दरवाजा काही कारणामुळे खराब झाला होता. तो दरवाजा लावताना आणि उघडताना अतिशय जोरजोरात आवाज येत होता, ज्यामुळे हे प्रवासी खूप वैतागले. अशावेळी एका प्रवाशाने डोक्याखाली घ्यायची उशी दरवाजावर अडकवली, ज्यामुळे दरवाजा उघड झाप करताना येणारा आवाज बंद झाला. यावेळी संपूर्ण व्हिडीओ ट्रेनमधील एका महिला प्रवाश्याने आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला. अनेकांना प्रवाशाचा हा देसी जुगाड आवडला आहे.

jully.singh. 31105 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यावर अनेक जण कमेंट्स करत आहेत. काही लोक म्हणतायत की, “दीदी, अशाने कंपार्टमेंटमध्ये कूलिंग कसे होणार?” त्याचबरोबर काही लोक या देसी जुगाडचे कौतुक करताना दिसत आहेत, तर अनेकांनी ट्रेनमधील या समस्येवरून रेल्वे प्रशासनाच्या सेवा सुविधांवर प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे.

हेही वाचा – PAN 2.0 Apply Online: नवीन पॅन कार्ड काही मिनिटांत येईल तुमच्या ईमेलवर; फक्त फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस

प्रवाशांनी आपल्या परीने ही समस्या तात्पुरती सोडवली, पण एसी कोचसारख्या प्रीमियम सेवेदरम्यान अशा अडचणी येऊ नयेत याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित करत आहेत. सोशल मीडियावर या घटनेबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त करत रेल्वेने अशा समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे.

Story img Loader