उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तृतीयपंथी व्यक्ती आणि एक ई-रिक्षाचालक भांडताना दिसत आहेत. तृतीयपंथी व्यक्तीने ई-रिक्षाचालकाचे १० रुपयांचे भाडे देण्यास नकार दिल्यानंतर हा वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. भररस्त्यात दोघे वाद घालत मारामारी करतानाचा हा व्हिडीओ दिसत आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना चार ते पाच दिवसांपूर्वीची असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तृतीयपंथी व्यक्तीने ई-रिक्षाचालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्या व्यक्तीने त्याला ई-रिक्षातून ओढत खाली उतरवले आणि शिवीगाळ करीत थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांनी एकमेकांचे टी-शर्ट पकडले आणि नंतर बुक्क्यांनी मारहाण करू लागले. यावेळी ई-रिक्षाचालकाने स्वतःच्या बचावाचा प्रयत्न करीत आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. धक्कादायक बाब म्हणजे मारामारी सुरू असतानाच तृतीयपंथी व्यक्तीने भररस्त्यात स्वच:ची पॅन्ट काढली आणि चालकाला धमकावण्यास सुरुवात केली.

इतकेच नाही, तर अशा विचित्र अवस्थेततही तिने चालकाला मारहाण करणे सुरूच ठेवले. यावेळी दोघांची मारामारी पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांची गर्दी जमा झाली होती. काही वेळाने यातील काही लोकांनी पुढे येत दोघांची समजूत घातली. त्यानंतर चालक आणि ती तृतीयपंथी व्यक्ती तिथून निघून गेली. दोघांकडूनही पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पण, त्या दोघांच्यातील मारहाणीचा व्हिडीओ कोणीतरी शूट केला आणि तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चालत्या बसच्या दरवाजाजवळ उभी महिला, अचानक तोल गेला अन् कोसळली खाली, नंतर जे झालं फारच भयानक; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

सोशल मीडिया युजर्सकडूनही ती महिला तृतीयपंथी असल्याचा दावा केला जात आहे; पण तिच्या या विचित्र कृतीवर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर अनेकांना तिचे असे वागणे पाहून धक्काच बसला आहे. या घटनेचे नेमके ठिकाण अद्याप कळलेले नाही; पण सार्वजनिक ठिकाणी हे लज्जास्पद कृत्य करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता लोक उपस्थित करीत आहेत.