सोशल मीडियाच्या काळात खाद्यपदार्थांची विकण्याच्या पद्धतींमध्येही बदल झाला आहे. आजकाल विविध खाद्यपदार्थांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आजकाल प्रत्येकजण फूड ब्लॉगर झाला आहे. कोणत्या पदार्थांचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे फोटो -व्हिडीओ अनेकजण पाहतात. त्यामुळे आज काल सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ पोस्ट करणे हे कोणत्याही खाद्यपदार्थाच्या प्रसिद्धीसाठी ट्रेंड झाला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात अनेक लोक खाद्यपदार्थांवर विचित्र प्रयोग करत असतात. तुम्ही अशा अनेक विचित्र पदार्थांचे व्हिडीओ पाहिले असतील ज्याची कोणी कल्पना केली नसेल. सध्या अशाच एका खाद्यपदार्थाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
तुम्हाला गोड पदार्थ आवडतात का? विशेषत: तुम्हाला जर गुलाबजाम आवडत असेल तर कदाचित हा व्हिडीओ तुम्हाला आवडू शकतो. सध्या बंगळुरमधील गुलाबजामचा व्हायरल होत आहे, आश्चर्याची गोष्ट अशी की या गुलाजामचा रंग नेहमीप्रमाणे नसून पारदर्शक आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. हे पारदर्शक गुलाबजाम सध्या चर्चेत आहेत.
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, बर्फासारखी दिसणारी एक वस्तू प्लेटमध्ये गोल गोल फिरताना दिसत आहे. ज्याच्या वर एक छोटा गुलाब जामुन ठेवला जातो. हा व्हिडीओ पाहून लोकांना प्रश्न पडला आहे की हा गुलाबजाम खायचा कसा?
वास्तविक हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध ब्लॉगर @tastethisbangalore यांनी त्यांच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करताना, ब्लॉगरने कॅप्शनमध्ये लिहिले – “पारदर्शक गुलाब जामुन”( Transparent Gulab Jamun ). त्याने आपल्या फॉलोअर्सना प्रश्न विचारला, ”तुम्ही ही अनोखी मिठाई खाल्ली आहे का?” हा व्हिडीओ पोस्ट केल्यापासून आतापर्यंत अनेकांनी तो पाहिला आहे.
या विचित्र मिठाईवर लोक जोरदार कमेंट करत असताना एका यूजरने व्हिडिओ पाहिल्यानंतर विचारले – “आम्ही यासाठी पारदर्शक पैसे देऊ शकतो का?” तर दुसर्याने युजरने लिहिले- “हे बर्फासारखे दिसते, जे एका गलिच्छ प्लेटवर ठेवलेले आहे, ते सिंकमध्ये ठेवा आणि हा खेळ थांबवा”. आणखी एका युजरने लिहिले – “हा डोळा आहे”. त्याच वेळी, एका युजरने GIF अपलोड केला आहे की, जणू त्याला हे पाहून चक्कर येऊ लागली आहे
.