भारतासह जगभरात स्वच्छतेचे महत्व सांगणारे व्हिडीओ आणि पोस्ट व्हायरल होत असतात. लोक आपआपल्या पद्धतीने स्वच्छतेसाठी पुढाकार घेताना दिसतात. जर आपण निसर्ग किंवा परिसराच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला नाही तर निसर्ग तीच घाण पुन्हा बाहेर फेकतो, पण स्वच्छेतेकडे लोक दुर्लक्ष करतात, तर काही लोक वेळीच जागरुक होतात. पण माणसांपेक्षा प्राणी, पक्ष्यांना स्वच्छतेबाबत अधिक जाण असते याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा विषय खूप काही शिकवून जाणारा आहे. तसेच आपल्याला आपल्या जबाबदारीचीही जाणीव होते. हा व्हिडीओ एका कावळ्याचा आहे, जो एका पार्कमध्ये पडलेली बाटली उचलतो आणि डस्टबिनच्या शोधात भटकत असतो यावेळी शेवटी तो एका डस्टबिनजवळ पोहोचतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
कावळ्याने माणसांना दिली शिकवण
हा व्हिडीओ @TansuYegen या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, या कावळ्यासारखे व्हा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका पार्कमध्ये अनेक लोक फिरत असतात. तेवढ्यात तिथे एक कावळा येतो, यावेळी त्याच्या चोचीत पाण्याची एक रिकामी बाटली असते. ही बाटली तो चोचीत पकडून इकडे- तिकडे पाहत असतो. कदाचित तो डस्टबिनच्या शोधात असेल अनेक वाटते. पण तो खरचं डस्टबिन शोधत असतो, कारण काही वेळाने तो एका डस्टबिन जाऊन बसतो आणि बरोबर बाटली डस्टबिनमध्ये टाकतो. कचरा टाकताच तिथून उडून जातो.
या कावळ्याकडून माणसाने खरोखरच शिकवण्यासारखे आहे. विशेषत: परिसरात किंवा कुठल्याही पर्यटन स्थळी जाऊन कचरा इकडे तिकडे फेकणाऱ्या लोकांनी तर यातून अधिक शिकण्याची गरज आहे. जर मुका प्राणी हे समजू शकत नसेल तर माणसाने खरचं शिकण्याची सवय लावली पाहिजे.
लोक या व्हिडीओवर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. एकाने लिहिले की, हा अतिशय साधा संदेश आहे, तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिले की, हा व्हिडीओ पाहून माणसांनाही लाज वाटली पाहिजे.