Live Accident Pune : दुचाकी असो किंवा चारचाकी कोणतेही वाहन चालवणे ही काही सोपी गोष्ट नाही. सतत आसापास होणाऱ्या गोष्टींकडे लक्ष ठेवावे लागते नाहीतर आपले लक्ष विचलित झाले की मोठी दुर्घटना घडू शकते. पावसाळ्यात विशेषत: जास्त काळजी घ्यावी लागते कारण रस्ते ओले झाल्याने निसरडे होतात ज्यामुळे त्यावरून वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता असते. अनेकदा जोरदार पावसामध्ये समोरचे काही दिसत नाही अशावेळी चालकांना पावसाचा जोर कमी होईपर्यंत अडोशाला थांबण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा पावसाळ्यात झाडांच्या फांद्या किंवा झाड पडल्याच्या घटना घडतात. अनेकदा धावत्या वाहनांवर देखील झाड कोसळल्याच्या घटना घडतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका दुचाकीस्वाराच्या अंगावर झाडाची फांदी पडल्याचे दिसते आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे.

दुचाकीवर पडली झाडाची फांदी

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, रस्त्यावर वाहनांची ये-जा सुरू आहे. पाऊस पडून गेल्याने रस्ता ओला झालेला दिसत आहे. दरम्यान हेल्मेट न परिधान करता एक दुचाकीस्वार भरधाव वेगाने रस्त्यावर जात असतो तेवढ्यात त्याच्या दुचाकीवर झाडाची फांदी पडते. दुचाकीस्वार थोडक्यात वाचतो कारण फांदी त्याच्या अंगावर न पडता वाहनाच्या पुढच्या चाकावर पडते ज्यामुळे त्याचा तोल जातो पण कसे तरी दुचारी सावरत तो रस्त्याच्या बाजूला येऊन थांबतो आणि पुन्हा मागे वळून पाहतो. जर चुकून ही फांदी दुचाकीस्वाराच्या डोक्यात पडली असती तर होत्याचे नव्हते झाले असते त्यामुळे चालकांना नेहमी हेल्मेट वापरण्याची विंनती केली जा आहे. हा सर्व प्रकार मागून येणाऱ्या वाहनचालकाच्या हेल्मेटला लावलेल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…

हेही वाचा – ११० वर्ष जुनी परंपरा! ‘या’ गावात उडी मारून डोक्याने फोडली जाते दहीहंडी, Video होतोय Viral

अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा – “एक होता डोंगर….!” विद्यार्थ्यांना नाचत-गात बडबडगीत शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video चर्चेत; बालपणीचे दिवस आठवतील

व्हायरल व्हिडीओ vasant_rawate नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडी पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “लाइव्ह अॅक्सिडेंट (अपघात) पुणे”. कॅप्शनवरून लक्षात येते की हा व्हिडीओ पुण्यातील आहे.

व्हिडीओवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत. एकाने लिहिले की, “देवाने त्याला हेल्मेट परिधान करण्यासाठी आणखी एक संधी दिली आहे.”

दुसरा म्हणाला, माझ्याबरोबर अशीच घटना घडली पण सुदैवाने मी हेल्मेट घातले होते.

तिसरा म्हणाला, “देव तारी त्याला कोण मारी!

हा व्हिडीओ हेच सांगतो की, पावसाळ्यात वाहन चालवताना नेहमी सतर्क रहा आणि हेल्मेट परिधान करा.