आपण अनेक माणसांमध्ये कामाप्रतीची तळमळ पाहिली असेल. अशी माणसे आपले काम सर्वोत्तम कसे होईल याच्याच प्रयत्नात असतात आणि त्यासाठी ते काहीही करण्यासाठी तयार असतात. एकप्रकारे ते आपल्या कामासाठी वेडे असतात. असाच वेडेपणा एका फोटोग्राफरने केला आहे. एका स्नो लेपर्डचे फोटो काढण्यासाठी या पठ्ठीने जे केलंय ते पाहून सर्वच चाट पडले आहेत.
अमेरिकेतील फोटोग्राफर किटिया पावलोस्की हिने नेपाळमधील अतिदुर्गम खुंबू व्हॅलीमधून या स्नो लेपर्डचे फोटो काढले आहेत. हिमालयातील हिम बिबट्याच्या फोटोने नेटकऱ्यांना थक्क केले आहे. विशेष म्हणजे या बिबट्याचे फोटो काढण्यासाठी तिने बर्फातून तब्बल १६५ किलोमीटर पायी प्रवास केला. याबाबत तिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. हे फोटो काढण्यामागे तिला करावी लागलेली मेहनत तिने या पोस्टमधून सांगितली.
ड्रायव्हिंग टेस्ट आहे की चक्रव्यूह? वाहनचालकाचे भन्नाट कौशल्य पाहून तुम्हीही चक्रावून जाल; Viral Video एकदा पाहाच
पुरस्कार विजेती फोटोग्राफर किटिया हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, “फँटम अॅली नावाच्या हिम शिखरावर असलेल्या एका खिंडीवर एक हिम बिबट्या बसला आहे.” ती पुढे म्हणाली, “पृथ्वीवरील सर्वांत निषिद्ध भूभाग, श्वास घेण्यासही त्रास होईल इतकी उंची, उंचच उंच पर्वत आणि बर्फाने आच्छादलेला भूभाग फिरल्यानंतर मला हा सर्वांत कठीण फोटो मिळाला. मात्र, हा एक फायद्याचा संच आहे.” दरम्यान, नेटकरी हे फोटो पाहिल्यावर थक्क झाले असून ते यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.