संगीताला स्वतःची भाषा असते असं म्हटलं जातं, शिवाय संगीताचे लय आणि सूर केवळ माणसांनाच नव्हे तर प्राण्यांही मंत्रमुग्ध करतात. आजपर्यंत आपण सर्वांनी माणसांना संगीताच्या तालावर नाचताना पाहिलं आहे, पण तुम्ही कधी एखाद्या प्राण्याला संगीताच्या तालावर नाचताना पाहिलं आहे का? नक्कीच पाहिलं असेल कारण अनेक लग्नामध्ये मोठ्याने वाजणाऱ्या गाण्याच्या तालावर घोडे नाचत असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक चिमुकला गाणं म्हणत असून त्या गाण्यावर चक्क घोडा नाचत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुलाच्या गाण्यावर नाचणाऱ्या घोड्याचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर हॉग नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लहान मुलगा घोड्यासमोर गाताना दिसत आहे. यावेळी घराच्या बाहेर असणारा घोडा खिडकीतून आत बघताना दिसत. मुलाने गाणं म्हणायला सुरुवात करताच घोडा मान हलवायला सुरुवात करतो. घोड्याला नाचताना पाहून लहान मुलालाही खूप आनंद झाल्याचं पाहायला मिळत आहे.

नेटकरी म्हणतायत “खूप गोंडस…”

लहान मुलाच्या आणि घोड्याचा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘जेव्हा घोडा तुमचा सर्वात मोठा चाहता असतो.’ या व्हिडिओला अवघ्या दोन दिवसांत १४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर अनेक नेटकरी व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘”प्राण्यांमध्ये आपण कल्पना करतो त्यापेक्षा जास्त कला असते. खूप छान दिसत आहे.” तर दुसर्‍याने लिहिलं, “गायक आणि डान्सर दोघेही खूप गोंडस आहेत” तर तिसऱ्याने, “मला ते खूप आवडलं असून हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही” असं लिहिलं आहे.