आजपर्यंत तुम्ही लग्न समारंभात नाचणारा किंवा शर्यतीमध्ये धावणारा घोडा पाहिला आहे, पण कधी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या कारमध्ये घोडा घुसल्याचं पाहिलं आहे का? नसेल तर आज तुम्हाला ते देखील पाहायला मिळणार आहे. हो कारण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कारच्या मागच्या काचेमध्ये एक घोडा अडकल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
कारमध्ये घोडा अडकल्याचा व्हिडिओ व्हायरल –
रस्त्यावक उभ्या असलेल्या एका कारमध्ये घोडा अडकल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या मधोमध एक घोडा कारच्या मागे अडकल्याचं दिसत आहे. महत्वाची बाब म्हणजे कारमध्ये अडकलेला घोडा अत्यंत शांतपणे एका जागी उभा असल्याचंही दिसत आहे. शिवाय कारची मागील काच तुटलेली असून घोड्याचे पुढचे दोन्ही पाय आत शिरल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
घोडा वाईटरित्या अडकल्यामुळे त्याच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नाहीये. व्हिडीओ पाहून असे वाटते की घोड्याने त्या गाडीच्या मागच्या बाजूला उडी मारण्याचा प्रयत्न केला असावा आणि यावेळीच घोड्याच्या पायाने काच फुटल्यामुळे तो आतमध्ये अडकल्याचं दिसत आहे. तर हा घोडा कारमध्ये नेमका कसा अडकला हे पाहण्यासाठी कारचा मालक दरवाचा उघडताना दिसत आहे. सोशल मीडियावर यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. या अगोदरही एक घोडा गाडीची पुढची काच फोडून आत शिरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. खूप प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात आले होते. अनेकदा अशा ठिकाणी घोडे अडकतात, जिथून त्यांना खूप प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात येतं.