सोशल मीडियावर अनेक असे लोक आहे जे आपल्या भन्नाट आयडीयांमुळे लोकांना आकर्षित करतात. शिवाय अनेक लोक असेही आहेत जे वेगवेगळे आणि लोकांचे मनोरंजन आणि जनजागृती करणारे व्हिडीओ बनवून खूप मोठे झाले आहेत. सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जे रातोरात एखाद्याला फेमस करु शकतं, याची अनेक उदाहरणं आपण याआधी पाहिली आहेत. मात्र काही लोक असेही असतात जे केवळ फेमस होण्यासाठी विचित्र स्टंट करत असतात. ज्यामुळे त्यांच्यावर अनेकदा त्यांनानेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करावा लागतो. सध्या अशाच दोन महिलांचा समुद्रकिनारा स्वच्छ करण्याचे नाटक करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकरी आणि पर्यावरणप्रेमी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमुळे दोन महिला इन्फ्लुएन्सर्सचा खोटेपणा उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर इतरांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या या महिला कॅमेऱ्यामागे नेमकं काय करतात हे पाहिल्यावर तुम्हीदेखील थक्क व्हाल यात शंका नाही. शिवाय या व्हिडीमुळे आता नेटकरी इतर इन्फ्लुएन्सर्सच्या कामावरदेखील संशय घेऊ लागले आहेत. तसेच अशा लोकांना फॉलो करणाऱ्यांचा अपेक्षाभंग झाल्याचंही काहीजण म्हणत आहेत.

हेही वाचा- चौथ्या लग्नाची हौस वकिलाला पडली महागात; पहिल्या बायकोने थेट कोर्टातच धुतला, हाय वोल्टेज ड्रामा होतोय Viral

नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हिडिओमध्ये एक महिला इन्फ्लुएन्सर समुद्रकिनाऱ्यावर साचलेला कचरा उचलताना दिसत आहे. ती दोन मोठ्या पिशव्यांमध्ये किनाऱ्यावरील कचरा भरताना दिसत आहे. यावेळी तिची सहकारी फोटो आणि व्हिडीओ काढताना दिसत आहे. परंतु जसा कॅमेरा बंद होतो, त्यावेळी त्या दोघीही गोळा केलेल्या कचरा किनाऱ्यावर तसाच फेकून देतात आणि निघून जातात. त्यामुळे त्यांचा ढोंगीपणा उघड झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. शिवाय हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लाईक मिळवण्यासाठी आणि स्वत:चे फॉलोवर्स वाढवण्यासाठी लोकं कोणत्या थराला जाऊ शकतात, याचं भयानक वास्तव समोर आल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “तुम्हाला पर्यावरणाची काळजी आहे असे दिसते.” टिकटोकरने व्हिडिओमध्ये महिलेच्या कृत्यांचे विनोदी वर्णन केले आहे. आपण पर्यावरणाची खरोखर काळजी घेत असल्यासारखे कसे दिसावे यासाठी तो मार्गदर्शक करत असल्याचं ऐकू येत आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणतो, “पहिल्या भागामध्ये, तुमच्या मित्राला तुम्ही कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये कचरा भरत असल्याचे शूट करायला सांगा. भाग दोन, आता लाटांशी लढत, ऑस्कर-विजेता अनोखी कामगिरी पार पाडत आहे. भाग तिसरा, वाईट नृत्य करून तुमचे चांगले कृत्य साजरे करा. भाग चार, तुमचे काम पूर्ण झाल्यावर कचऱ्याच्या पिशव्या तिथेच फेकून द्या.

एका युजरने हे कृत्य पाहून किळस आल्याचं म्हटलं आहे. दुसऱ्याने लिहिलं, “म्हणूनच मला इंटरनेटवरील प्राणी वाचवणे, पर्यावरणाची स्वच्छता करणे, लोकांना मदत करणे याविषयीच्या पोस्टचा तिरस्कार आहे, तुम्ही ते करत असल्याचे शूट करता, तुम्हाला खरोखर करायचे असेल तर ते गपचूप करा.”