सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका सायकलवरुन तब्बल ९ जण जाताना दिसत आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी लोकसंख्या वाढीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर अनेकांनी या मुलांच्या गरिबीबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. पण हा व्हिडीओ जर तुम्ही बघाल तर तुमच्या मनामध्ये, एका सायकवर एवढे जण कसे जाऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित होईल.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक आफ्रिकन माणूस रस्त्यावर सायकल चालवताना दिसत आहे. पण आश्चर्याची आणि तेवढीच धक्कादायक बाब म्हणजे सायकलसारख्या नाजूक दुचाकीवर त्याच्यासोबत एक दोन नव्हे तर तब्बल ९ मुलं बसलेली दिसत आहेत. शिवाय एका सायकलवर एवढी लोकं कशी बसू शकतात असा प्रश्न तुम्हाला पडला तो योग्य आहे.

Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल
Terrifying Video of father saving his children life from accident video went viral on social media
हा VIDEO पाहून कळेल आयुष्यात वडिलांचं असणं किती गरजेचं, बापाने मरणाच्या दारातून लेकराला आणलं परत, पाहा नेमकं काय घडलं
Video of young girl doing stunt with little kid went viral on social media
VIDEO: उंचावरून उडी मारली अन्…, चिमुकल्याला घेऊन तरुणीने रस्त्यावर केला जीवघेणा स्टंट, पाहा नेमकं काय घडलं?
Hardworking old women Viral Video
‘गरिबी माणसाला जगणं शिकवते…’ भरपावसात आजींनी असं काही केलं; VIDEO पाहून नेटकरीही झाले भावूक
Viral video of two little girls getting fighting is going viral on social Media after shankarpalya funny video
आता गं बया! बोबड्या बोलात चिमुकलींचा एकमेकींसोबत जोरदार राडा; VIDEO पाहून पोट धरुन हसाल मंडळी

आणखी वाचा- अती घाई संकटात नेई! औषध म्हणून महिलेने गिळले अ‍ॅपलचे एअरपॉड; एक्स-रे पाहून डॉक्टरही झाले चकीत

पण ती मुलं ज्या प्रकारे या साकलवर बसून प्रवास करत आहेत, ते बघून त्या मुलांची काळजी वाटतं आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारी जवळपास सर्वच मुलं लहान आहेत आणि ती सायकलला लटकत शाळेत जाताना दिसत आहेत. कारण या सायकलला काही स्कुलबॅग देखील लटकवलेल्या दिसत आहेत. त्यामुळे या लहानग्यांच्या जीवाशी असा खेळ का खेळला जात आहे असा सवाल नेटकरी विचारत आहेत.

सायकलस्वाराचं कौतुक –

एकीकडे या व्हिडीओवर संताप आणि दु:ख व्यक्त केलं जात आहे. तर दुसरीकडे या सायकलस्वाराच्या समतोलपणाचे कौतुक केलं जात आहे. कारण एवढ्या मुलांना एकत्र घेऊन जाणं म्हणजे तारेवरती कसरत असल्याचं देखील बोललं जात आहे.

नेटकऱ्यांची चिंता वाढली –

हा व्हिडिओ ट्विटरवर वेगाने व्हायरल होताच, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी जगाच्या वाढत्या लोकसंख्येबद्दल चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिले की, “गरिबी दिसत आहे, संयुक्त कुटुंबात कदाचित एकच चक्र आहे.” दुसर्‍याने लिहिले की, “ते संयुक्त कुटुंबाचा भाग असू शकतात.” निरपराधांचा जीव धोक्यात घालण्यात काय अर्थ आहे, तुम्ही चालू आहात. एक धोकादायक मार्ग. हे कधीही धोकादायक ठरू शकते.”