ऑनलाइन फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटो सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी ती जाहिरातींमुळे वादात राहते तर कधी त्यांच्या डिलीव्हरी बॉयच्या विविध कृत्यांमुळे कंपनीची चर्चा सुरु असते. अशातच आता पुन्हा एकदा Zomato च्या ट्विटची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. जे वाचल्यानंतर अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण होत आहे.

हो कारण आता झोमॅटोने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन एक ट्विट केलं आहे ज्यामध्ये लिहिले आहे, “भोपाळमधील अंकिता कृपया तुमच्या जुन्या प्रियकराला कॅश ऑन डिलिव्हरीवर जेवण पाठवणे बंद करा, ही तिसरी वेळ आहे, तो पैसे देण्यास नकार देत आहे!” झोमॅटोने हे ट्विट करताच त्यावर नेटकरी अनेक मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Devendra Fadnavis and PM Narendra Modi
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “देवाभाऊ” म्हणताच दिलखुलास हसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेमकं काय घडलं?
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Image Of Mark Zuckerberg
Mark Zuckerberg : मार्क झुकरबर्ग यांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप, मेटाच्या अधिकाऱ्यांची होणार चौकशी
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
zomato swiggy now sell their food products directly to consumer
झोमॅटो, स्विगीकडून आता त्यांच्या खाद्य उत्पादनांची थेट विक्री; हॉटेल व्यावसायिकांचा विरोध, कारवाईची सरकारकडे मागणी 
Aishwarya Narkar
“ही विकृती…”, सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “मी ब्लॉक केलं म्हणून तो माणूस…”

हेही वाचा- शॉर्टकट नडला, पिझ्झा थेट नाल्यात पडला! डिलिव्हरी बॉयचा विचित्र पराक्रम, व्हायरल Video पाहून पोट धरुन हसाल

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिलं, “ठिक आहे झोमॅटो. ‘डिलीव्हरी अ स्लॅप’ नावाची नवीन सेवा सुरू करण्याचा विचार करा. मला आशा आहे की हा उपक्रम फायदेशीर ठरेल.” तर दुसर्‍याने लिहिलं, “झोमॅटोवाले वेगळ्याच प्रकारचं प्रमोशन करत आहेत.” त्याचवेळी आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “ज्यांच्याजवळ काही आयडीया नाही, त्यांनादेखील हे आपल्या जुन्या जोडीदाराला त्रास देण्याची आयडीया देत आहेत.” तर विक्रांत साहूने नावाच्या वापरकर्त्याने लिहिलं आहे की, झोमॅटोने त्याचे नियम बदलले आहेत का? कारण तुम्ही एकदा COD घेतला नाही, तर तुम्ही त्याला कॅश ऑन डिलिव्हरी देत ​​नाही. तर तिसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिलं, “झोमॅटोच्या लोकांनी अंकिताला पैसे द्यायलाही सांगायला पाहिजे.”

तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की, झोमॅटोचे हे ट्विट प्रमोशनसाठी केले गेले आहे. असे ट्विट करून झोमॅटोला लोकांचे लक्ष वेधायचे आहे. हे ट्विट आतापर्यंत ११ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. शिवाय हजारो लोक कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे Zomato चे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय बनलं आहे.

Story img Loader