सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात तर काही आपणाला आश्चर्यचकीत करणारे असतात. मात्र यामध्ये काही हृदयस्पर्शी व्हिडीओ असतात जे पाहिल्यानंतर आपण भावूक होतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकजण त्याच्या कष्टाचं कौतुक करत आहेत.
खरं तरं, प्रत्येक व्यक्तीला म्हातारपणी आराम करण्याची गरज असते, परंतु असे अनेक लोक असतात, ज्यांना आयुष्यभर फक्त कामे करावी लागतात, त्यांच्या नशीबी आराम नसतोच. अशा लोकांमध्येह काहीजण त्यांच्या इच्छेने काम करतात, तर काहीना त्यांची परिस्थिती कष्ट करण्यास भाग पाडते. त्यामुळे दोन वेळच्या भाकरीसाठीही त्यांना खूप मेहनत करावी लागते.
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती हातगाडी ओढताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल भयानी नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “उदारता आणि मानवतेपेक्षा मोठे काहीही नाही.” व्हिडीओत एक व्यक्ती क्षमतेपेक्षा जास्त वजन असलेली हातगाडी ओढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
हातगाडी ओढणाऱ्या व्यक्तीला खूप त्रास होत असल्याचंही दिसत आहे. तरीही तो पूर्ण ताकदीनिशी मालाने भरलेला गाडी ओढण्याचा प्रयत्न करत आहे. हातगाडी ओढणाऱ्याला होणारा त्रास पाहून एका ऑटो चालक अनोख्या पद्धतीने त्याची मदत करण्यासाठी धावून गेल्याचं व्हिडीओत दिसत आहे. सोशल मीडियावर लोक या ऑटो चालकाचे खूप कौतुक करत आहेत. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर अनेक नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने “खूप छान” तर दुसर्याने हा हृदयस्पर्शी व्हिडिओ असल्याचं म्हटलं आहे. एकीकडे ऑटो चालकाचे कौतुक होत असतानात नेटकरी व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीला ट्रोल करत आहेत. कारण कॅमेर्यामागची माणूसदेखील त्या वयस्कर व्यक्तीला मदत करू शकला असता, असं नेटकरी म्हणत आहेत.