आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करणं हा आयुष्यातील खास क्षणांपैकी एक महत्वाचा आणि आयुष्यभर आठवणीत राहणारा क्षण असतो. अनेकजण आवडत्या व्यक्तीला प्रपोज करुन इम्प्रेस करण्यासाठी वेगवेगळ्या आयडीया वापरत असतात. मात्र, जसा काळ बदलला तशी प्रपोज करण्याची पद्धतही बदलली. हो कारण सध्या एका तरुणाने आपल्या आवडत्या मुलीला प्रपोज करण्यासाठी असाच एक जुगाड केला आहे, ज्यामुळे त्याला मुलीचा होकार तर मिळालाच. मात्र, त्याची प्रपोज करण्याची स्टाईल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

@amymaymacc नावाच्या तरुणीने आपल्यया ट्विटर अकाऊंटवर तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या ट्विटमध्ये तिने तिच्या प्रियकराने कीबोर्डच्या माध्यमातून कसं प्रपोज केलं, हे सांगितलं आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे, “त्याने कीबोर्डद्वारे मला गर्लफ्रेंड बनण्यासाठी प्रपोज केलं, मी हे कधीच लपवून ठेवणार नाही”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
woman made saree from newspaper video viral
“अरे ही तर उर्फी जावेदपेक्षा खतरनाक”, तरुणीने चक्क न्यूज पेपरपासून बनवली साडी, Video पाहून लोक झाले शॉक
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?

हेही पाहा- उन्हापासून बचाव, इंधनाचीही बचत; तरुणाने भंगारापासून बनवलेल्या जुगाडू बाईकची उद्योगपतींनाही पडली भुरळ, पाहा Video

व्हायरल फोटोमध्ये, मुलाने कीबोर्डच्या बटणांद्वारे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या या ट्विटमध्ये एका फोटोत कीबोर्डवर ‘Be My Girlfriend Sayang’ असं लिहिलेलं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये हे जोडपं हसताना दिसत आहे.

सोशल मीडियावर अनोखा प्रपोज व्हायरल –

हेही वाचा- क्षणात होत्याच नव्हत झालं! रील बनवताना केलेलं भलतं धाडस बेतलं जीवावर, तिघांनी एकत्र नदीत उडी मारली अन्…,

तरुणाने अनोख्या पद्धतीने केलेलं हे प्रपोज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हजाराहून कमी फॉलोअर्स असलेल्या या ट्विटर अकाऊंटवरील पोस्टला आतापर्यंत २३ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर या पोस्टला अडीच लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं असून त्यावर हजारो नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “मुलाने नवीन पद्धतीने प्रपोज केलं” दुसऱ्याने लिहिलं की, बरं झालं मुलीने प्रेमाचा स्विकार केला. तर तिसऱ्याने, “कीबोर्डद्वारे प्रपोज करा, कल्पना चांगली आहे” असं कमेंट बॉक्समध्ये म्हटलं आहे. तर अनेक तरुणांनी या फोटोवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत, प्रपोज करण्यासाठी आपणही कीबोर्डची मदत घेणार असल्याचंही काहीजण म्हणत आहेत.

Story img Loader