सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यामध्ये डान्सशी संबंधित अनेक व्हिडीओचा समावेश असतो. यामध्ये कोणी लग्न समारंभात तर कोणी भररस्त्यात नाचताना आपणाला पाहायला मिळतं. पण व्हायरल होणारे सर्वच व्हिडीओ नेटकऱ्यांना भावतात असं नाही. कारण काही मोजकेच व्हिडीओ असे असतात जे नेटकऱ्यांना मनापासून आवडतात, सध्या सोशल मीडियावर असाच एक लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो नेटकऱ्यांना खूप आवडला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नैनितालमधील नैना देवी मंदिराच्या परिसरातील असून यामध्ये एक लहान मुलगी अतिशय सुंदर आणि मनमोहक डान्स करताना दिसत आहे. दिविशा सिंग नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत हा व्हिडीओ ९ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर त्याला १ लाख ४७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

Success Story Of Rama Murthy Thyagarajan In Marathi
Success Story : ना आलिशान गाडी, ना मोबाईलचा वापर; कोटींची संपत्ती असून साधेपणाने जगतात आयुष्य; वाचा रामामूर्ती यांचा प्रवास
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
loksatta Lokshivar fake onion seeds in the market has increased for sale
लोकशिवार: कांद्याच्या बनावट बियाण्यांचा धोका
grandmother dance in wedding video
“बाया झायल्या गार गं” साठी ओलांडलेल्या आजीबाईंचा खांद्यावर बसून तुफान डान्स; VIDEO झाला व्हायरल
Ratan Tatas significant investments helped startups to stand on thier own feet
स्टार्ट-अप्ससाठी रतन टाटा नेहमीच कसे ठरले ‘देवदूत’?
Mark-Zuckerberg Top 10 richest people in the world
Mark Zuckerberg : ‘मेटा’चे सीईओ मार्क झुकरबर्ग बनले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, जेफ बेझोस यांना टाकलं मागे; संपत्ती कितीने वाढली?
9 out of 10 people make losses in F&Os according to a report by capital markets regulator SEBI
‘एफ अँड ओ’मध्ये १० पैकी ९ जण तोट्यात; भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड
Mercedes-Benz, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”

हेही पाहा- ओसाड जमिनीतून पाणी काढण्यासाठी महिलांचा भन्नाट जुगाड, मेहनतीचा Video पाहून तुम्हीही कौतुक कराल

व्हायरल व्हिडिओमध्ये, एक चिमुकली मंदिराच्या परिसरात खूप छान डान्स करताना दिसत आहे. शिवाय डान्स करताना तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारख्या आहेत. डान्स करतानाचा या मुलीचा उत्साह आणि आनंद पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवाक केली आहे. कोणी तिच्या अप्रतिम डान्सचं कौतुक करत आहे, तर कोणी तिच्या धाडसाला सलाम केला आहे.

हेही पाहा- “तुमच्या झोपेसाठी रस्त्याची सुरक्षा खाटेवर…?” वाहतूक पोलिसांनी शेअर केलेला मजेशीर Video व्हायरल

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “मुलीच्या घरच्यांनी तिच्यावर खूप छान संस्कार केले आहेत.” तर दुसऱ्याने खूप छान बाळा अशी कमेंट केली आहे. दरम्यान, या व्हिडीओवर काहींनी आक्षेपदेखील घेतला आहे. मंदिर परिसराचा वापर इंस्टाग्राम रील्स तयार करण्यासाठी वापरु नये असं कोही लोकांनी म्हटलं आहे. तर काहींनी लहान मुलीने निरागसपणे केलेला तो डान्स आहे, त्यामुळे त्यावर आक्षेप घेणं चुकीचं असल्याचंही म्हटलं आहे.