आपल्या देशात विविध देशी जुगाड करणाऱ्यांची संख्या कमी नाही. या जुगाडू लोकांनी केलेल्या अनेक जुगाडाची भुरळ मोठमोठ्या उद्योगपतींही पडत असते. प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी तर अनेकवेळा आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अशा जुगाडू व्यक्तींची दखल घेतल्याचंही आपण पाहिलं आहे. शिवाय प्रत्येक जुगाडू व्यक्ती आपली अवघड कामं सोप्पी व्हावी आणि पैशासह वेळेची बचत करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असतात आणि त्यातून मग काहीतरी भन्नाट अशा जुगाडाचा शोध लागतो.
सध्या अशाच एका व्यक्तीने नवी बाईक न घेता आपल्या जुन्या बाईकचा असा काही वापर केला आहे, जो पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल हे कोणीच सांगू शकत नाही. कधी कोणी कारला हेलिकॉप्टर बनवतो, तर कोणी ओलाच्या इलेक्ट्रीक बाईकच्या स्पीकरचा वापर क्रिकेटची कॉमेंट्री करण्याकरीता करतो. आता असाच एक नवा जुगाडाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच थक्क झाले आहेत. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने अशी बाईक बनवली आहे, ज्याचा आवाज बुलेटपेक्षाही जास्त आहे. पण त्या बाईकला साधी पेट्रोल भरण्यासाठी टाकीही नाही.
हेही पाहा- गुटख्याची तलफ इतकी? प्रवाशाने विमानाची खिडकी उघडण्याची केली मागणी; Video पाहिल्यानंतर पोट धरून हसाल
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, एक पुर्ण भंगार झालेली एक बाईक पाहून एक व्यक्ती आश्चर्यचकीत होतो आणि या बाईकच्या मालकाकडे जातो. हा व्यक्ती बाईकच्या मालकाला म्हणतो की, ‘तुमच्या दुचाकीचा सायलेन्सर फाटला आहे.’ सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या बाईकच्या मालकाने बाईकचा आवाज जास्त येऊ नये सायलेन्सरमध्ये चक्क दगड ठेवला आहे. शिवाय या बाईकची सीट आणि चाकं सोडून बाकी कोणताही पार्ट तुम्हाला व्हिडीओत दिसणार नाही.
सर्वात कहर म्हणजे या गाडीला पेट्रोलच्या टाकीऐवजी पेट्रोलने भरलेली बाटली लावून हा पठ्ठ्या आपली बाईक चालवत आहे. एक प्रकारे ही बाईक संपल्यात जमा असतानाही हा माणूस भरधाव वेगाने आपली बाईक पळवताना दिसत आहे. शिवाय बाईकमधून जबरदस्त असा आवाज येत आहे की नेटकरी त्या बाईकचं कौतुक करताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या या अनोख्या जुगाडू बाईकचा व्हिडिओ भागवत पांडे (@bhagwat__pandey) नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुनशेअर करण्यात आला आहे.
हेही पाहा- Viral Video: झोपलेल्या तरुणावर वानराने केला अचानक हल्ला, तोंडावरील चादर ओढली अन्…
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलें आहे की, “ब्रेक सोडून सर्व काही लागत आहे आणि हॉर्न सोडून सर्व काही वाजत आहे” हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला असून त्यावर अनेक लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने म्हटलं आहे, ‘अप्रतिम जुगाड आहे, तर कुणी म्हटलंय ‘सर, त्याचा आत्मविश्वास बघून असं वाटतंय की तो काही बाईक दुरुस्त करणार नाही.’ ही बाईक पाहून बाईक प्रेमी आश्चर्यचकित झाले आहेत शिवाय ही बाईक तो माणूस कसा चालवतो ? याचाच विचार अनेकजण करत करत आहेत.