माणसाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण म्हणजे त्याचे बालपण. या वयात ना मैत्रीचा अर्थ कळतो ना कोणत्या स्वार्थासाठी मित्र बनवले जातात, मात्र, बालपणीती मैत्रीच खरी असते असं म्हटलं जातं. लहानपणी मौजमजा करताना मुलं सर्व मर्यादा ओलांडतात. आजही सोशल मीडियावर लहान मुलांचे खेळतानाचे व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांच्या बालपणीची आठवण येते. बालपणीचे मित्र आठवतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये काही मुलांनी लहानपणी खेळण्याचा आनंद घेण्यासाठी अनोखा जुगाड केला आहे, जो पाहून अनेकांनी त्यांच्या बालपणीची आठवण येत आहे.
लाईव्ह मॅच पाहण्यासाठी केला जुगाड –
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गावातील काही मुलं क्रिकेट खेळताना दिसत आहेत. तर काही मुलं ती मॅच टीव्हीवर बघत बसले आहेत. पण ती टीव्ही सुरु नाही, शिवाय तिला स्क्रीन नाही, त्यामुळे तिच्यातून आरपार सर्व काही दिसत आहे. तेसच समोर क्रिकेट खेळणारे मित्रही टीव्हीमध्ये सहज दिसत आहेत. मुलांनी हे सर्व मजेचा भाग म्हणून केलं आहे, पण त्यांनी केलेला हा अनोखा जुगाड अनेकांना हसायला भाग पाडत आहे.
नेमकं काय आहे व्हिडीओत –
व्हिडीओमध्ये, काही मुले बसलेली आहेत आणि त्यांच्यासमोर एक टीव्हीचा सेट ठेवला आहे. पण त्या टीव्हीला स्क्रीन नसल्याचंही दिसत आहे. तिथेच काही अंतारावर काही मुलं क्रिकेट खेळत आहेत. प्रत्यक्ष टीव्हीवर लाइव्ह स्ट्रीमिंग मॅच सुरू असल्याप्रमाणे त्यांनी मैदानात स्वत:ला उभे केले आहे. यावेळी एक गोलंदाज चेंडू फेकतो आणि फलंदाज थेट तो जोरात फटकावतो, हा चेंडू उडून थेट प्रेक्षकांच्या जवळ टीव्हीतून बाहेर पडतो. याचवेळी एक मुलगा चेंडू घेण्यासाठी येतो आणि तो टीव्हीच्या फ्रेममधून चेंडू प्रेक्षकांकडून घेतो, ते दृश्य खूप मजेशीर आहे.
टीव्हीवर दिसण्याची हौस मुलांनी केली पूर्ण –
मुलांनी अनोखा जुगाड करुण स्वत:चे खेळाडू, स्वत:ची मॅच आणि टीव्हीवर दिसण्याची हौस त्यांनी क्षणात पूर्ण केली. खेड्यातील मुलांना भलेही लाईव्ह मॅच बघता येत नसली तरी ते त्यांची ती इच्छा अनोख्या पद्धतीने पुर्ण केली आहे. मुलांच्या या लाईव्ह मॅचचा अनोखा व्हिडिओ @TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत १.१ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि ३६ हजार लोकांनी लाईक केला आहे. शिवाय नेटकरी या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.