बस असो की ट्रेन प्रवाशांची सीटवरून होणारी भाडणं सामान्य झाली आहेत. शिवाय अशी भांडणं आपणाला अनेकदा पाहायला मिळतात. कधीकधी तर ही भांडणं इतक्या टोकाला जातात की प्रवाशी एकमेकांना मारहाण करायला मागेपुढे पाहात नाहीत. अशा अनेक घटनांचे व्हायरल झालेले व्हिडीओ आपण याआधीही पाहिले आहेत. सध्या बसमधील काही महिला प्रवाशांच्या हाणामारीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ३ ते ४ महिलांची सीटवरुन भांडण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ही घटना कर्नाटकातील असल्याचे सांगितले जात आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, एक महिला बसच्या सीटवर बसणार होती, त्याचवेळी तिथे दुसरी महिला येते आणि तिला त्या सीटपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करते, पण इतक्यात आणखी एक महिला मागून येते आणि पहिल्यांदा सीटजवळ गेलेल्या महिलेला जी ढकलण्याचा प्रयत्न करत असते तिचे केस ओढायला सुरुवात करते. यावेळी दोघींच्या बाजूने असणाऱ्या महिलादेखील एकमेकींचे केस ओढायला सुरुवात करतात. धक्कादायक बाब म्हणजे काही वेळाने त्या सर्व एकमेकींना मारहाण करत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. महिलांची भाडणं पाहून बसमधील लहान मुलं जोरजोरात रडत असल्याचा आवाजही येत आहे. शिवाय बसमध्ये खूप गर्दी आहे, मात्र महिलांची भाडणं सोडवण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही.
नेटकऱ्यांनी व्यक्त केली चिंता –
महिलांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. एका युजरने म्हटलं आहे, “स्त्रियांना एकमेकांचे केस ओढताना पाहणे खरोखरच धक्कादायक आहे.” तर दुसऱ्या एकाने ‘”WWE, वुमन रेसलिंग एंटरटेनमेंट” अशी मजेशीर कमेंट केली आहे. तर तिसऱ्या नेटकऱ्याने KSRTC मध्ये या गोष्टी खूप सामान्य असल्याचं म्हटलं आहे.