अनेकदा तुम्ही लोकांना दारूच्या नशेत विचित्र कृत्य करताना पाहिलं असेल. अशा दारु पिणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय आजकाल अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे दारू पितात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, तो जेवढा धक्कादायक आहे तेवढाच मजेशीर देखील आहे. कारण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना हसावं की रडावं हेच कळत नाहीये. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये फायर शॉट दारु प्यायल्यामुळे एका तरुणाच्या चेहऱ्याला आग लागल्याचं दिसत आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर आतापर्यंत १३ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
दारू पिताना चेहऱ्याला लागली आग
सोशल मीडियावर दारुड्यांचे एकापेक्षा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच हा व्हिडीओ आहे, ज्यामध्ये एक तरुण त्याच्या मित्राला फायर शॉट दारू पाजण्याचा प्रयत्न करत आहे. मित्र तरुणाला दारू पाजण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या चेहऱ्यावर दारूचे काही थेंब पडतात. ज्यामुळे त्याचा चेहरा पेट घेतो. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मस्करी करत असताना अचानक त्याच्या कानासह संपूर्ण चेहऱ्याला आग लागते. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे व्यक्तीच्या मानेतून आगीच्या ज्वाळा निघायला लागल्याचं दिसत आहे. यानंतर ते दोघे हाताने आग विझवतात आणि पुन्हा जोरजोरात नाचायला सुरुवात करतात.
नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया –
व्हिडिओमध्ये तरुणाच्या चेहऱ्यावर आग लागल्यावरही तो निष्काळजीपणा करताना आहे. आग विझवताना तो ज्या पद्धतीने मजा करत आहे की, त्याच्याबरोबर काही अपघात झालाच नाही, असं पाहणाऱ्यांना प्रश्न पडत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं, “त्या व्यक्तीने आगीला पाण्यासारखे चोळले.” तर आणखी एका यूजरने को तरुणाने चेहऱ्याला आग लागल्यानंतरही लगेच नाचायला सुरुवात केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले आहे.