सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात अनेकजण इंटरनेटवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रील्स बनवत असतात. या रीलचं लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना वेड लागलं आहे. शिवाय अनेकदा रीलसाठी तरुण मुलंमुली अनोखे स्टंट करताना दिसतात. शिवाय असे विचित्र आणि धोकादायक स्टंट करणं अनेकांना महागात पडल्याचंही आपण पाहिलं आहे. तरीही स्टंट करण्याची अनेकांची सवय काही केल्या जात नाही. सध्या अशाच एका मुलीला भररस्त्यात रील करणं चांगलच महागात पडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबाद येथील एलिवेटेड रोडवर एका मुलीने रील बनवल्यामुळे पोलिसांनी तिला १७ हजारांचा दंड केला आहे. या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याआधाही पोलिसांनी एलिवेटेड रोडवर रील्स बनवणाऱ्यांना सूचना दिल्या होत्या, असं असतानाही या मुलीने या रोडवर रील बनवत पोलिसांच्या सुचनेला केराची टोपली दाखवली मात्र, आता तिला तिची चूक खूप महागात पडली आहे.

हेही पाहा- शाळेत घेऊन जाणाऱ्या आईवर रुसला आणि चक्क स्कुटीवर मांडी घालून बसला, Video पाहून पोट धरून हसाल

व्हायरल होत झालेल्या व्हिडीओमध्ये एक काळ्या रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी एलिवेटेड रोडवर लाल रंगाची कार उभी करून रील बनवताना दिसत आहे. गाझियाबाद पोलिस आयुक्तालयाचे डीसीपी रामानंद कुशवाह यांनी सांगितले की, ‘सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक मुलगी लाल रंगाच्या कारसह एलिवेटेड रोडवर रील बनवताना दिसत आहे. या मुलीचं नावं वैशाली चौधरी असं असून तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटरु हा व्हिडीओ शेअर केला होता.

हेही पाहा- चिमुकलीची बडबड ऐकून वडिलांनी जोडले हात; Viral व्हिडीओची नेटकऱ्यांनाही पडली भुरळ

कोणत्याही प्रकारची स्टंटबाजी, वाढदिवसाची पार्टी किंवा एलिवेटेड रस्त्यावर वाहतुकीला अडथळा आणणे हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे आम्ही ही कारवाई केली.’ तर कारच्या नंबराद्वारे वाहन मालकाला मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १३३ नुसार १७ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. त्यामुळे या मुलीला रील करणं चांगलेच महागात पडलं असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trending ghaziabad police fined rs 17000 for girl making elevated road reel jap
Show comments