सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ असे असतात जे पाहून आपणाला आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना धक्का बसला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर खूप कमेंट करत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये, एक व्यक्ती ऑफिसमधून घरी येताच त्याची बायको त्याला जोरजोरात मारहाण करत असल्याचं दिसत आहे. महिलेने आपल्या नवऱ्याला केलेल्या मारहाणीची संपूर्ण घटना घरात लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
व्हिडीओमधील व्यक्ती घरी आल्यावर डोक्यात घातलेले हेल्मेट काढत असताना त्याची पत्नी समोरून धावत येते आणि त्याच्यावर तुटून पडते. महिलेने आपल्या पतीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा हा व्हिडिओ ट्विटरवर Crazy Clips नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत २० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून तो २९ जानेवारी २०२३ तारखेचा असल्याचं दिसत आहे.
काही मीडिया रिपोर्टनुसार, ही व्यक्ती १४ तासांच्या शिफ्टमध्ये काम करून घरी परतली होती. त्यानंतर पत्नीने त्याला मारहाण करायला सुरुवात केली. शिवाय पती घरातील कचरा घेऊन गेला नसल्याने पत्नी रागवली होती आणि त्याच रागात तिने नवऱ्याला मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप कळालेलं नाही.
व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस –
महिलेने नवऱ्याला मारहाण केल्याच्या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी तर या कमेंटद्वारे आपापले अनुभव शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “मी अशा खूप महिलांना ओळखतो. माझ्या रोमँटिक जीवनात नाही, पण मी अशा स्त्रियांना ओळखते. ज्या खूप टॉक्सिक असतात.” तर आणखी एकाने लिहिलं आहे “पती-पत्नीमध्ये वाद झाला त्यामुळे पत्नीने पती घरी येताच त्याला मारहाण केली.” तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिलं आहे, ” जेव्हा तुम्ही परवानगी न घेता खूप वेळ शिफ्टमध्ये काम करता तेव्हा असे होते.”