अमित शहा आणि आदित्य मदिराजू या दोन नावांची २०१९ मध्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती. त्याचं कारण म्हणजे या दोन समलैंगिकांनी न्यू जर्सी, अमेरिका येथे हिंदू पद्धतीने भव्यदिव्य असं लग्न केलं होतं. आता हे समलैंगिक जोडपं येत्या मे महिन्यात त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे. हो, हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल मात्र हे खरं आहे.
अमित आणि आदित्य यांनीच याबाबतची माहीती आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दिली आहे. शिवाय ते त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. तर ‘आम्हाला समलैंगिक पालक नव्हे, तर केवळ पालक व्हायचं आहे’ असंही या दोघांनी म्हटलं आहे. या जोडप्याच्या पॅटर्निटी शूटचे फोटो पीपल मॅगझिनने आपल्या इंस्टाग्रामवर पेजवर शेअर केले आहेत.
हेही वाचा- शिक्षकाने आठवीतल्या मुलीला लिहिलं प्रेमपत्र, शेवटी धमकी देत म्हणाला, “एकदा वाचून…”
लग्न झाल्यापासून हे जोडपे जैविक मुलं होण्याचे बारकावे शिकत होते. सरोगेट्स, एग डोनर्स आणि जेस्टेशनल कैरियर्स (surrogates, egg donors and gestational carriers) यांच्यातील फरक समजून घेण्यापासून ते त्यांच्या कुटुंबाच्या वाढीसाठी कोणता जोडीदार घ्यायचा हे ठरवण्यापर्यंतची सर्व माहिती या जोडप्याने शिकून घेतली. विषमलैंगिक जोडप्यांपेक्षा यांच्यासाठी जास्त खर्च असल्याचेही त्यांना जाणवलं. अखेर एग डोनर मिळाल्यानंतर, या आनंदाच्या बातमीची पुष्टी करण्यासाठी त्यांनी इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) च्या चार वेळा भेट दिली.
हेही वाचा- .. अन् आपल्या लेकींसाठी बापाने बदललं स्वतःचं लिंग; म्हणाला ‘या’ देशात बाप होणे म्हणजे पाप कारण..
आदित्यने लोकांना सांगितलं की, “आम्हाला आशा आहे, मूल झाल्यानंतर आमच्यासाठी हे सर्व आणखी सामान्य होईल की, तुम्ही समलैंगिक जोडपे असलात तरी काही फरक पडत नाही, तुम्ही तुम्हाला हवे तसे आयुष्य जगू शकता. माझी इच्छा आहे की, असं होऊ शकते. शिवाय जे आमच्यासारखं राहण्याचा जगण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शक आहोत. कारण, आमच्यानंतर अनेकांनी अशा पद्धतीने लग्न केली आहेत. शिवाय ते आमचे आभार मानण्यासाठी आमच्याकडे येत असतात. कारण आमच्यामुळे त्यांना पालक आणि कुटुंबीयांना कसं समजावलं जाऊ शकतं याबाबतची माहिती मिळाली आहे.
इतर जोडप्याप्रमाणे हे दोघेही दोघेही मदर्स डे, फादर्स डे आणि सर्व सुट्टी साजऱ्या करायच्या आहेत. शिवाय ते त्यांच्या आयुष्यात मुल आल्यानंतर त्यांचे जीवन कसे असेल याची त्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. तर अमित म्हणाला, “आम्ही आताच्यासारखे गे जोडप्यांबद्दल बोलणार नाही. आम्ही फक्त जोडप्यांबद्दल बोलू.” तर आदित्य म्हणाला, “आम्ही समलैंगिक पालक नव्हे तर फक्त पालक होणार आहोत.”
दरम्यान, या दोघांचे लग्न झाले होते त्यावेळी या जोडप्याने आकर्षक एकसारखे पोशाख परिधान केले होते. त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करताना आदित्यने इंस्टाग्रामवर लिहिले की, “माझं एक स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं. आता मी ते नातं मनापासून जपतो आहे आणि मी दररोज विश्वाचे आभार मानतो की त्याने तुम्हाला माझ्यासाठी @amit_aatma बनवले.’
तो म्हणाला, “नवी दिल्लीतील तेलगू मुलगा न्यू जर्सीतील एका गुजराती अमेरिकन मुलाशी लग्न करेल, असे मला कोणी सांगितलं असतं तर मी ढोकळा बनवायला शिकलो असतो. माझे नाटक सहन केल्याबद्दल आणि मला तुमच्या स्वप्नांचा आणि ध्येयांचा एक भाग बनवल्याबद्दल धन्यवाद. ” पाठिंब्याबद्दल धन्यवाद. 3 वर्षांसाठी शुभेच्छा.” असं त्यांने आपल्या इस्टाग्राम पोस्टमध्ये लिहलं होतं.