AC Failure In Flight: अनेक सर्व सामान्यांचे स्वप्न असते की त्यांना एकदा तरी विमानात बसण्याची संधी मिळावी. विमानात मिळणाऱ्या सुख सुविधा, प्रवाशांना दिली जाणारी विशेष वागणूक या सर्व गोष्टींसाठी प्रत्येकालाच विमानात बसण्याबाबत आकर्षण असतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का उंच वर आकाशात हवेत विमान उडत असताना अचानक एसीच बंद झाला तर? बस किंवा एखाद्या कारमधून प्रवास करताना एसी बंद झाला तर निदान खिडक्या तरी उघडता येतात. पण विमानात तो पर्यायच नाही. मग हवेत विमानात एसी बंद पडल्यानंतर आतल्या प्रवाशांची काय अवस्था झाली असेल, हा विचार तुमच्या मनात नक्कीच आला असेल. हे जाणून घेण्यासाठी व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विमान आकाशात उडत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान फ्लाइटमधील एसी अचानक बंद पडला आहे. त्यामुळे विमानातील वातावरण खूपच खराब झाले होते. सुरक्षा सूचना कार्डसह तुम्ही प्रवाशांचा पंखा पाहू शकता. एसी बंद पडल्याने अनेकांची अवस्था इतकी बिकट होते की ते रडायला लागतात. काही प्रवासी तर आतमध्ये बेशुद्ध होऊन पडले होते. विमान जमिनीपासून कित्येक फूट उंचीवर असल्यामुळे ऑक्सिजनचं हवेतलं प्रमाण अत्यंत विरळ असतं. त्यात विमानात एसी सुद्धा बंद. त्यामुळे अनेकांना श्वास घेण्यासाठी अडचणी येऊ लागल्या. अक्षरशः काही लोक हातात असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंनी वारा घालत श्वास घेताना दिसून आले. काही प्रवासी विमानातील कर्मचाऱ्यांकडे तक्रारी करू लागले. केबिन क्रूकडून एसी पुन्हा सुरळीत करण्यासाठी लागोपाठ प्रयत्न सुरू होते. पण यात त्यांना यश येत नव्हते. विमानातील हा सर्व गोंधळ एका महिलेने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून तो सोशल मीडियावर शेअर केला.

आणखी वाचा : VIRAL : ट्विटरवर ट्रेंड करतंय ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटील…एकदम ओके..!’; Memes चा पाऊस!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : तळपत्या उन्हात राबणाऱ्या आईसाठी लेकीची माया पाहून हृदय पिळवटून जाईल

हा व्हिडीओ बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ डेहराडूनहून मुंबईला जाणाऱ्या गो फर्स्टच्या विमानाचा आहे. G8 2316 क्रमांचाच्या फ्लाइटमध्ये हा प्रसंग घडला. हा व्हिडीओ १४ जुन रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या प्रकरणात कडक कारवाई करण्याची मागणी केलीय. नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या व्हिडीओवर प्रतिक्रिया शेअर आपला रोष व्यक्त केला आहे.

Story img Loader