बंगाल अभिनेता प्रोसेनजीत चॅटर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एका अशा मुद्द्यावर लक्ष घालण्याची विनंती केली जी त्यांना खूप महत्त्वाची वाटते. अलीकडेच त्यांनी स्विगी या डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे एक आर्डर मागवलेली. ऑर्डर तर पोहोचली परंतू त्यात खाण्याचे पदार्थ नव्हते. हे पाहून वैतागलेल्या या अभिनेत्याने थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना टॅग करून एक ट्विट शेअर केलं. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हा मोठा मुद्दा असून याकडे लक्ष घालण्याची विनंती या अभिनेत्याने केलीय. त्यानंतर या अभिनेत्याचं ट्विट अगदी वाऱ्यासारखं सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं. त्याने शेअर केलेल्या या ट्विटवरून सोशल मीडियावर नेटिझन्सच्या क्रिएटीव्हीटीचा महापूर आला असून वेगवेगळ्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडलाय.

बंगाली अभिनेता प्रोसेनजीत चॅटर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टॅग करत शेअर केलेल्या या ट्विटमध्ये लिहिलं की, “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा…३ नोव्हेंबर रोजी, मी फूड डिलिव्हरी अ‍ॅप Swiggy वर ऑर्डर दिली. काही वेळाने ऑर्डर डिलीव्हर झाली असल्याचं स्टेटल दाखवण्यात आलं, पण मी मागवलेले पदार्थ मला मिळालेच नाही.” त्याची ही ऑर्डर प्रीपेड होती असं देखील सांगितलं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अभिनेत्याने स्विगी कंपनीकडे मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांना पैसे परत करण्यात आले.

यापुढे त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं की, “मी तुमचं लक्ष वेधून घेऊ इच्छितो, कारण मला वाटतं की कोणालाही या समस्येचा सामना करावा लागू शकतो. जर एखाद्याने त्यांच्या पाहुण्यांसाठी ऑर्डर केली असेल आणि त्यांनी मागवलेले पदार्थ मिळाले नाही तर काय? जर कोणी डिनरसाठी या फूड अ‍ॅप्सवर अवलंबून असेल तर काय होईल? ‘ते उपाशी राहतील का?”

आणखी वाचा : अजबच! कैद्यांच्या छळासाठी ‘बेबी शार्क’ गाण्याचा वापर; जेल प्रशासनाविरोधात थेट कोर्टात याचिका!

बंगाली अभिनेता प्रोसेनजीत चॅटर्जी यांनी फूड डिलिव्हरी मिळाली नाही म्हणून थेट पंतप्रधान आणि मुख्यमत्र्यांना टॅग करत शेअर केलेलं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेच विषय ठरलाय. या अभिनेत्याच्या ट्विटवरून सोशल मीडियावर अनेक युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत. काही युजर्सनी तर या ट्विटची खिल्ली उडवलीय. तर काही युजर्सना त्यांच्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळवण्यासाठी एक नवा चमचमीत विषय मिळालाय. या ट्विटवरील विनोदी कमेंट्स वाचून तर तुम्ही पोट धरून हसाल.

आणखी वाचा : PHOTOS : ‘हे’ देशी जुगाड पाहून तुम्ही हैराण व्हाल! यांच्याकडे प्रत्येक प्रोब्लेमवर आहे सोल्यूशन

पहा काही मजेदार प्रतिक्रिया…

बर्‍याच नेटिझन्सना सुरूवातीला हा विनोद वाटला, पण जसं हे ट्विट व्हायरल होऊ लागलं, त्यानंतर सोशल मीडियावर मजेदार मीम्स आणि GIF शेअर होऊ लागले. अनेकांनी तर या शेअर केलेल्या पोस्टवर संयुक्त राष्ट्र, अमेरिकेचे अध्यक्ष आणि नासा यांनाही टॅग केलंय. सगळ्याच विनोदाची गोष्ट म्हणजे काही जणांनी तर थेट सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केलीय. हे सर्व मीम्स वाचल्यानंतर तुमचा आजचा दिवस खऱ्या अर्थाने आनंदाचा गेल्यासारखं वाटू लागेल.

पहा काही मीम्स…

काही नेटिझन्सनी तर जगातील गरिबी आणि उपासमारीच्या समस्यांच्या तुलनेत हा मुद्दा खूपच क्षुल्लक असल्याचं म्हटलंय. तर काही जणांनी हे ट्विट केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलं असल्याचं म्हटलंय. थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत मुद्दा नेण्यासारखं यात काहीही गंभीर नसल्याचं काही युजर्सचं म्हणणं आहे.

Story img Loader