इंस्टाग्रामवरील रील स्क्रोल करताना, लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओ आपणाला पाहायला मिळतात. त्यातील काही आपल्याला पोट धरुन हसायला लावतात तर काही आपल्याला भावूक करतात. सध्या सोशल मीडियावर एका लग्नातील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकऱ्यांना हसू आवरणं कठीण होत आहे. खरं तर लग्न म्हटलं की वऱ्हाडी मंडळींसाठी जेवणाची खास सोय केली जाते. पण लग्नाच्या वेळी पाऊस पडला तर ग्रामीण भागातील लोकांचे खूप हाल होतात.

सध्या असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पावसामुळे जेवायला बसणाऱ्या पाहूण्यांची गैरसोय झाल्याचं दिसत आहे. पण पाहुण्यांनी या पाऊसाचा ज्या पद्धतीने सामना केला आहे, ते पाहून अनेकजण त्यांचे फॅन झाले आहेत. शिवाय भारतीय लोक जेवणासाठी काहीही जुगाड करु शकतात असं नेटकरी म्हणत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये,लग्न मंडपात पाहुणे जेवायला बसले असताना मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाल्याचं दिसत आहे.

हेही पाहा- पठ्ठ्याने पैशांसाठी केला भन्नाट जुगाड, कोंबडीला हिरवा रंग देऊन OLX वर ६ हजार ५०० रुपयांना विकलं, बातमी वाचून व्हाल थक्क

जोरदार पाऊस पडल्यामुळे मंडपातून पाणी गळायला सुरुवात होते. पण यावेळी जेवायला बसलेले पाहुणे उठत नाहीत, तर ते खाली बसण्यासाठी दिलेल्या गाद्या आपल्या डोक्यावर धरतात आणि लग्नाच्या जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात करतात. पाहुण्यांनी गाद्यांचा वापर छत म्हणून केल्याचा हा भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही पाहा- “बायकोच्या पायांची मालिश…” मुलगा करोडपती, आई करते दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी…; वृद्ध महिलेने सांगितली धक्कादायक कहाणी

हा व्हिडीओ @avi_kumawat_88 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ७० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. शिवाय या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्सचा पाऊस पाडल्याचं पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “काहीही झाले तरी आम्ही जेवण सोडणार नाही.” दुसऱ्याने लिहिले की, जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो. मात्र, काही वापरकर्त्यांनी या लोकांनी केलेल्या जुगाडाचे स्वागत केले आहे, त्यांनी लिहिलं आहे की, या लोकांनी डोक्याचा योग्य वापर केला, अन्यथा बरेच अन्न वाया गेले असते.

Story img Loader