पुर्वी प्रवास करताना योग्या दिशा शोधण्यासाठी चंद्र-सुर्य-ताऱ्यांची दिशा, कागदावर कोरलेले नकाशे किंवा स्थानिकाची मदत घेतली जात असे. पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता हे संपूर्ण जागाचा नकाशा आपल्या मोबाईवर पाहता येतो. गुगल मॅप, अॅपल मॅप आणि इतर नेव्हिगेशन ऍप्लिकेशन्सच्या मदतीने नकाशांचा वापर करणे अगदी सोपे झाले आहे. गुगुल मॅप नेहमी अचूक दिशा दर्शवत असल्याचा दावा करते. रोड ट्रिपला किंवा सहलीला जाताना त्याचा खूप चांगला वापर देखील करता येतो पण अनेकदा गुगल मॅपचा वापरणारे प्रवासी भलत्याच ठिकाणी पोहचल्याचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत काही दिवसांपूर्वीच गुगल मॅपने प्रवास करणाऱ्या एका महिलेची कार एका खोल दरी असलेल्या एका ब्रिजवर अडकली होती. सध्या एका फलकाचा फोटो व्हायरल होत आहे ज्यावर Google Is Wrong असे लिहिले आहे. स्थानिकांनी हा फलक गुगल मॅपवर विश्वास ठेवून प्रवाशांना सावध करण्यासाठी लावला होता.
कोडागु कनेक्टच्या( Kodagu Connect) एक्स हँडलवर या फलकाचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फलकावर लिहिले आहे की, “गुगल चुकीचे आहे. हा रस्ता क्लब महिंद्राकडे जात नाही. हा फोटो पाहून लक्षात येते की हा फलक जवळपास राहणाऱ्या रहिवाशांनी लावला आहे. कदाचित या ठिकाणी गुगुल मॅपने दाखवलेल्या माहितीमुळे काही प्रवासी चुकीच्या दिशेने गेल्याची प्रकरणे आधी अनुभवली असावी असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.
फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. फोटोवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले, “भारत नवशिक्यांसाठी नाही!(“India is not for beginners!)” तर दुसऱ्याने लिहिले, “हा हा हा! गुगल आंटी आजकाल बहुतेकदा चुकीची माहिती देते.”
सोशल मीडियावर कमेंट करताना एकाने स्वत:चे गुगुल मॅप वापरताना आलेला अनुभव सांगितला, “गुगल नकाशे नेहमीच योग्य नसतात. मागच्या आठवड्यात माझी बहीण सकलेशपुरा येथे गेली, गुगल मॅपचा वापर केला ज्यामुळे शेवटी जिथे रस्ता संपतो तिथे पोहचली आणि कार खराब रस्त्यावर अडकली. सुदैवाने काही स्थानिकांनी त्यांना मदत केली. हिल स्टेशनला भेट देताना नेव्हिगेशनवर कधीही विसंबून राहू नका. एकदा पर्वतांमध्ये गेलो की, Google नेहमी चुकीचे ठरते. मला आठवते की, एकगा आम्ही सुल्ल्यामार्गे कुक्के सुब्रमण्य ते मडिकेरी असा प्रवास कसा केला होता. Google ने आम्हाला एक अचानकपणे उजवीकडे वळायला सांगितले ज्यामुळे आम्ही ८० पेक्षा जास्त किमी प्रवास केला आणि आम्ही चुकलो आहोत हे ओळखून स्थानिक व्यक्तीने योग्य मार्ग दाखवला.”
हेही वाचा – एका चाकावर बाईक चालवत तरुणाने केला धोकादायक स्टंट; Viral Videoने वेधले बंगळुरू पोलिसांचे लक्ष
विशेष म्हणजे, गुगल मॅपने प्रवाशांना गोंधळात टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशीच आणखी एक घटना केरळच्या कूराचुंडू येथे घडली जिथे वायलाडा मुल्लानपारा पर्यटन केंद्राकडे जाणाऱ्या लोकांच्या एका समुहाने गुगल मॅपनुसार चुकीचा शॉर्टकट घेतला आणि त्यांचे वाहन उलटल्याने त्यांची अवस्था खूपच वाईट झाली.”