कधी कधी मृत्यू इतका शांतपणे येतो की त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होऊन जातं. आकस्मिक मृत्यूशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मात्र सोशल मीडियावर असे व्हिडीओ समोर येतात की, कधी कधी त्यांना बघायची हिम्मतही होत नाही.विजेच्या खुल्या तारांमधून हाय व्होल्टेजचा विद्यूत प्रवाह वाहत असतो. या तारांना चुकून हात लागला तर मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. याच कारणामुळे विजेची तार तसेच ट्रान्सफार्मरपासून सर्वांनी दूर राहावे असे सर्रासपणे सांगितले जाते. मात्र, या सर्व सूचना दिलेल्या असूनदेखील अनेकवेळा गंभीर अपघात होतात. सध्या अशाच प्रकारचा एक अपघात समोर येत आहे. एका रेल्वे कर्मचाऱ्याला शॉक लागला, याचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती प्लॅटफॉर्मवर उभी असलेली ट्रेन साफ ​​करत आहे. लांब लोखंडी काठीवर कापड लटकवून तो प्रत्येक कोपऱ्यातून ट्रेन साफ ​​करत होता. मात्र क्षणभर तो विसरला की काठीची लांबी इतकी आहे की तो वरील हाय व्होल्टेज वायरच्या संपर्कात येऊ शकते. ट्रेन साफ ​​करताना व्यक्तीच्या हातातील काठी हाय व्होल्टेज वायरला धडकते आणि अचानक करंट लागल्याने त्या व्यक्तीची क्षणात राख होते. ही संपूर्ण घटना स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही. @cctvidiots नावाच्या युजरने ट्विटरवर ही क्लिप पोस्ट केली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही – शर्ट न घालता ऑनलाइन मीटिंगला आलेल्या शिक्षण विभागाचा अधिकारी निलंबित, युपीमध्ये घटनेने खळबळ

हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला असून आतापर्यंत या व्हिडीओला तब्बल २० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरीही व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत, एका युजरने म्हटले की, ‘काम करण्यापूर्वी सुरक्षा शिक्षण आणि प्रशिक्षण देणे खूप महत्त्वाचे आहे’