सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही अंगावर शहारा आणणारे असतात. सध्याची तरुणाई तर सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी काहीही करायला तयार असते. शिवाय फेमस होण्यासाठी विचित्र आणि जीवघेणे स्टंट करणाऱ्यांवर पोलीस कारवाई देखील करत असतात. पण सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका तरुणाने पोलिसांसोबत असं काही कृत्य केले आहे, जे पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. हो कारण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील तरुणाने चक्क पोलिसाच्या पायाला चावा घेतल्याचं दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही पाहा- सभागृहात बोलू न दिल्याने रागवला खासदार, सर्वांसमोर कपडे काढले अन्…, Video पाहून सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का

व्हायरल व्हिडीओमध्ये, एक पोलीस बाईकवर बसला असून तो गाडीत बसलेल्या दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याशी बोलत असल्याचं दिसत आहे. ते दोघेही रस्त्याच्या कडेला निवांत गप्पा मारत असतानाच अचानक एक तरुण तिथे लोळत येता. नागिन डान्सच्या स्टेपप्रमाणे जमिनीवरुन लोळत आलेला तरुण बाईकवर बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पायाचा चावा घेतो.

हेही पाहा- हुंड्यात बाईक मागणं नवरदेवाला पडलं महागात; सासऱ्याने ऐन लग्न समारंभात चप्पलेने मारहाण केली अन्…, व्हायरल Video पाहून थक्क व्हाल

लोळत आलेल्या तरुणाचा स्पर्श पायाला होताच पोलीस घाबरल्याचं दिसत आहे. यावेळी पोलिसाची बाईक खाली पडल्याचंही दिसत आहे. दरम्यान हा तरुण असा नाग बनून पोलिसाच्या पायाजवळ का आला? त्याने पोलिसाचा चावा का घेतला? याबाबतची काही माहिती समोर आलेली नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी या व्हिडीओवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया दिताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trending naagin dancer bites policemans leg video goes viral on social media jap
Show comments