सार्वजनिक बाथरुमचा वापर करताना अनेकांना बाथरुममध्ये एखादा छुपा कॅमेरा असेल का? अशी भिती वाटते. अनेकांच्या मनातील ही भिती खरी ठरवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हो कारण रॉयल कॅरिबियन क्रूझ शिपमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला क्रूझच्या सार्वजनिक बाथरुममध्ये लावलेला छुपा कॅमेरा आढळला आहे. दरम्यान, या प्रवाशाने या घटनेची माहिती क्रुझमधील अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, कॅमेऱ्यात तो लावणाऱ्यासह १५० पेक्षा जास्त लोकांचे रेकॉर्डिंग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
द हार्मनी ऑफ द सीज नावाच्या रॉयल कॅरिबियन क्रूझने २९ एप्रिल रोजी मियामी सोडले. बिझनेस इनसाइडर इंडियामधील लेखानुसार, सेंट मार्टिन, पोर्तो रिको आणि बहामास येथे थांबणारी ही सात दिवसांची क्रूझ होती. ही क्रूझ जहाज सुटल्यानंतर, दुसऱ्या दिवशी जेरेमी फ्रियास नावाच्या माणसाने जहाजाच्या वरच्या डेकवरील सार्वजनिक बाथरुममध्ये कॅमेरा लावला. ज्यामध्ये १५० हून अधिक लोकांचे रेकॉर्डिंग झाले आहे. तर रेकॉर्डिंग झालेल्यांपैकी बरेच लोक नग्न होते. कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलेले अंदाजे ४० जण अल्पवयीन असून त्यापैकी काही जण चार ते पाच वर्षांचे आहेत.
हेही पाहा- आधीच दारुची नशा त्यात GPS मुळे चुकली दिशा; २ महिला कारसह थेट समुद्रात गेल्याचा मजेशीर Video व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी त्याच क्रुझमधील दुसऱ्या प्रवाशाला बाथरुममध्ये लावलेला कॅमेरा दिसला, त्याने या कॅमेऱ्याबाबतची माहिती जहाजातील क्रू मेंबर्सना दिली. कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेले फुटेज काही तासांचे होते शिवाय या फुटेजमध्ये कॅमेरा बसवणारा देखील कैद झाला आहे. शिवाय बाथरुममधील कॅमेरा अशा पद्धतीने लावला होता की, त्याच्या लेन्समध्ये थेट टॉयलेटमधील दृश्य रेकॉर्ड होतील. दरम्यान, कॅमेरा लावणाऱ्या प्रवाशाची ओळख पटली असून त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान फ्रियासने आपणच टॉयलेटमध्ये कॅमेरा लावल्याचे कबूल केले आहे.
हेही पाहा- धावपट्टीवरील विमानाने अचानक पेट घेतला अन्…, जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या प्रवाशांचा Video व्हायरल
चौकशीनंतर त्याल संमतीशिवाय एका खाजगी क्षेत्रातील व्यक्तीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलं असून अधिकारी सध्या या घटनेतील पीडितांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या घटनेची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली असून अशा घटनांमुळे प्रवाशांची प्रायव्हसी धोक्यात येत असल्याचे अनेकजण म्हणत आहेत.