मुलीच्या जन्मामुळे एका महिलेचं नशीब पालटलं आहे. कारण, या महिलेने सकाळी मुलीला जन्म दिला आणि संध्याकाळी ती ८० लाखांची मालकीन बनली आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात ही मुलगी ‘लकी चार्म’ असल्याचं महिलेने म्हटलं आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील ब्रेंडा नावाच्या २८ वर्षीय महिलेने ९ नोव्हेंबरला सकाळी एका मुलीला जन्म दिला आणि त्याच दिवशी सायंकाळी तिला लॉटरी लागली.
या लॉटरीमध्ये तिला बक्षीस म्हणून तब्बल 80,000 पौंड म्हणजेच सुमारे 80 लाख रुपये मिळाले आहेत. त्यामुळे ही मुलगी जन्माला येतानाचं नशीब घेऊन आली असल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान, लॉटरीत जिंकलेल्या रक्कमेतून टॅक्स वगैरे कापून ब्रेंडाला जवळपास 53 लाख रुपये मिळाले. ते पैसे ३० नोव्हेंबर रोजी तिच्या खात्यात जमा करण्यात आलेत.
हेही पाहा- अहो ऐकता का.. चोरट्या बाईने ‘हे’ एक वाक्य म्हणत सोनाराला घातला लाखोंचा गंडा; Video बघा आणि सावध व्हा
दरम्यान, लॉटरी लागल्याची ही बातमी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. द मिररच्या वृत्तानुसार, लॉटरी जिंकल्यानंतर ब्रेंडा म्हणाली की “नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीने माझे नशीब बदलले, मी तिची आभारी आहे. ती माझ्यासाठी लकी चार्म आहे.” तसंच ‘यूएस पॉवरबॉल लॉटरी ड्रॉ’ जाहीर झाल्यानंतर मला खूप आनंद झाला.
जेंव्हा अधिकाऱ्यांनी मला ८० लाखांची लॉटरी लागल्याचं सांगितल तेव्हा माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. कारण, मी सकाळी एका मुलगी जन्म दिला आणि त्याच संध्याकाळी लॉटरी जिंकली. या दोन्ही आनंदी घटनांमुळे माझ्या संपूर्ण कुटुंबाला आनंदाचा धक्काच बसल्याचंही ब्रेंडा म्हणाली.
हेही वाचा- ‘खात्यात पैसे का नाहीत?‘ म्हणत बाईने घातला बॅंकेत राडा; दगडाने फोडल्या ATM च्या काचा अन्…
दरम्यान, ब्रेंडा मिळालेल्या पैशांतून आधी तिच्यावर असलेल्या कर्जाची परतफेड करणार असून त्यानंतर इतर कामासाठी त्या पैशांचा वापर करणार आहे. याआधीही ब्रेंडाला दोन मुलं आहेत. शिवाय ती तिच्या वाढदिवशी लॉटरीची तिकीट खरेदी करते. मात्र, तिने याआधी कधीच लॉटरीचे बक्षीस जिकंल नव्हतं. मात्र, मुलीच्या जन्मादिवशीच तिला लॉटरी लागली. त्यामुळे ही घटना आपल्यासाठी चमत्कारच असल्याचं ब्रेंडाने म्हटलं आहे.