आपण केलेल्या प्रामाणिक कामाचे फळ कधीतरी भेटतेचं असं म्हटलं जातं, सध्या असंच एक उदाहरण समोर आलं आहे. ते म्हणजे एका बर्गरच्या दुकानात काम करणाऱ्या ५४ वर्षीय व्यक्तीला रिटायरमेंटचं अनोखे असे गिफ्ट मिळाले आहे, ज्याचा त्यांने स्वप्नातही विचार केला नव्हता. हो कारण या व्यक्तीला रिटायमेंट गिफ्टमध्ये तब्बल ३ कोटींहून अधिकची रक्कम मिळणार आहे. यासाठी त्यांना शिवाय आजपर्यंत केलेल्या कामाच्या मोबदल्यात इतक्या रकमेची गिफ्ट मिळाल्यानंतर त्या व्यक्तीच्या आनंदाला पारावार उरला नाही. हे गिफ्ट मिळाल्यानंतर त्याने आपलं स्वप्न सत्यात उतरल्यासारखे वाटत असल्याचं म्हटलं आहे.
ब्रिटीश वृत्तपत्र डेली एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याचे नाव केविन फोर्ड असं आहे. केविन हा अमेरिकेतील लास वेगास येथील रहिवासी आहे. लासने २७ वर्षांच्या नोकरीच्या काळात एकही दिवस सुट्टी घेतली नव्हती. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या दिवशी लोकांनी त्याला सरप्राईज द्यायचे ठरवले होते. यासाठी GoFundme मोहीम सुरू करण्यात आली आणि केविनसाठी पैसे गोळा करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत ३ कोटी २६ लाख रुपयांहून अधिक देणगी जमा झाली आहे.
पैसे गोळा करण्याच्या मोहीमेची सुरुवात मागील वर्षी एका व्हिडिओनंतर सुरू झाली होती, ज्यामध्ये केविन ऑफिसमध्ये रिटायरमेंटनंतर मिळालेली गिफ्ट बॅग उघडताना दिसत आहे. केविनला निवृत्तीनंतर त्याच्या सहकाऱ्यांनी, चित्रपटाची तिकिटे, स्नॅक्स, स्टारबक्स ड्रिंक्स, पेन, लायटर यासारख्या छोट्या गोष्टी गिफ्ट दिल्या होत्या. हे पाहून लोकांनी त्याला काहीतरी मोठे गिफ्ट देण्याचा प्लॅन केला आणि त्यासाठी पैसे गोळा करायला सुरुवात केली.
केविनसाठी निधी गोळा करण्याची मोहीम तिच्या मुलीने सुरू केली होती. आपल्या वडिलांनी निवृत्तीनंतर नातवंडांसोबत आनंदी जीवन जगावे अशी मुलीची इच्छा होती. त्यानंतर लोकांनी देणगी द्यायला सुरुवात केली. देणगीदारांमध्ये अमेरिकन कॉमेडियन डेव्हिड स्पेडसारख्या सेलिब्रिटींचाही समावेश आहे. इंस्टाग्रामवर केविनचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने लोकांचे आभार मानले आहेत. एका टीव्ही शोमध्ये केविन म्हणाला,मला हे सर्व स्वप्नासारखं वाटत आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मी तुमचा ऋणी असून मी खूप आनंदी आहे.