प्रेम आंधळं असतं, प्रेमात पडलेली व्यक्ती आपल्या क्रशसाठी काहीही करायला तयार असते. अशा प्रेम प्रकरणांशी संबंधित अनेक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जी वाचल्यानतंर अनेकांना धक्का बसला आहे. हो कारण एका १५ वर्षाच्या मुलीने तिच्या क्रशला खूश करण्यासाठी असा डायट केला की ज्यामुळे तिला जीव गमवावा लागला.
या घटनेतील मुलीने तिच्या क्रशला खूश करण्यासाठी स्वत:चे तब्बल २५ किलो वजन कमी केले. जे तिच्या एकूण वजनाच्या निम्मे होते. ही घटना चीनमधील असून सध्या ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, मृत मुलीची उंची ५ फूट ४ इंच होती. ती २० दिवसांपर्यत डिप कोमामध्ये गेल्याने तिचा मृत्यू झाला. कारण यावेळी तिचे वजन २५ किलोपर्यंत पोहोचले होते. या मुलीचा आयसीयू बेडवर झोपल्याचा व्हिडीओ स्थानिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या घटनेतील मुलीने जानेवारी महिन्यात चिनी नववर्षाच्या तिसर्या दिवशी पाण्याचा डायट सुरू केला होता. तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला, कारण तिला जो मुलगा आवडत होता, तो तिच्यापेक्षा पातळ असलेल्या मुलीवर प्रेम करत होता. त्यामुळे तिने मुलाचं मन जिंकण्यासाठी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. मुलीचा विचित्र डायट लक्षात येताच पालकांनी तिला असं न करण्याबाबतचा सल्ला दिला मात्र तिने त्यांचं ऐकलं नाही.
दरम्यान, मृत मुलीच्या पालकांनी तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला असता तिने गाडीतून उडी मारली. त्यानंतर त्यांनी मोठ्या कष्टाने तिला रुग्णालयात नेले, परंतु मुलीने स्वत: ला इजा करण्यास सुरुवात केली आणि रुग्णालयातून पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मार्चच्या मध्यापर्यंत ती फक्त पाणी पित राहिली. शिवाय तिने ५० दिवस काहीही खाल्ले नाही. यामुळे तिला एनोरेक्सिया नर्व्होसाचा त्रास झाला आणि त्यावर उपचार न केल्याने तो आजार वाढतच होता.
पालकांनी उपचार बंद केले –
मार्चमध्ये तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत पोहोचली होती. त्यामुळे तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत ती कोमात गेली होती. यावेळी डॉक्टरांनी मुलीच्या पालकांना सांगितले की, आता त्यांच्याकडे दोनच मार्ग आहेत, एकतर मुलीला कोमात ठेवा किंवा तिला या दुखण्यापासून मुक्त करा. मुलीच्या पालकांनी खूप विचार केला आणि नंतर तिचे उपचार थांबवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तिने अखेर या जगाचा निरोप घेतला.