सीमा हैदर आणि सचिन ही दोन नावे मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. कारण पाकिस्तानमध्ये राहणारी सीमा ही आपल्या प्रियकरासाठी नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ती तिच्या चार मुलांसह भारतात आली आहे. सीमा PUBG च्या माध्यमातून ग्रेटर नोएडामधील सचिनच्या प्रेमात पडली होती. बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सीमा आणि सचिनला अटक केली होती, पण नंतर दोघांनाही जामीन मिळाला आणि आता दोघेही एकत्र राहत आहेत.

तर दुसरीकडे सीमाबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत, कोणी तिला गुप्तहेर म्हणत आहेत तर कोणी तिच्या संपूर्ण कहाणीला एक बनाव म्हणत आहेत. शिवाय अनेकांनी तर सीमाला भारतामध्ये राहून दिले जाऊ नये असंही म्हटलं आहे. मात्र, सीमाने तिच्यावर सतत गुप्तहेर असल्याच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. सीमाने तिच्यावर आरोप करणाऱ्यांना नेमकं काय उत्तर दिलं आहे ते जाणून घेऊया.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका

हेही पाहा- भररस्त्यात कारमध्ये घुसला घोडा, काचेत अडकले पाय; विचित्र अपघाताचा Video पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा

‘इंडिया टुडे’शी बोलताना पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने ती गुप्तहेर असल्याचे आरोप फेटाळले आहेत. ती म्हणाली, “असं काहीही नाही, अखेर सत्य बाहेर येईल. शिवाय असे असते तर मी माझ्या निरागस मुलांसोबत नाही तर एकटीच भारतात आली असते.” सीमाला तिच्या इंग्रजी बोलण्याबाबत प्रश्न विचारला असता तिने उत्तर दिले, “मी फक्त पाचवीपर्यंत शिकली आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया अॅप्सचा वापर करून कोणीही हे करू शकते. मला इंग्रजीचे काही शब्दही बोलता येत नाहीत आणि मला संगणक कसा चालवायचा हे देखील माहित नाही.”

हेही वाचा- क्षणात होत्याचं नव्हतं झालं! “तो रडत होता, मला झोपायचं होतं” बाळाला झोपवण्यासाठी आईने दुधात औषध मिसळलं अन्…

यावेळी सीमाला सचिनचा आवडता पदार्थ कोणता? असा प्रश्न विचारला यावेळ तिने सांगितलं, “सचिनला भेंडींशिवाय सर्व पदार्थ आवडतात, असं वाटतं की त्याला भेंडीची ऍलर्जी आहे.” दरम्यान, यावेळी सीमाने मागील काही दिवसांतील अनेक माध्यमांशी झालेल्या संवादाचा हवाला देत सचिन आणि त्याच्या कुटुंबासाठी स्वयंपाक करण्यासाठी वेळ मिळत नसल्याची तक्रारही केली.

सीमाला तिच्या आवडत्या चित्रपट प्रश्न विचारला असता, ती म्हणाली मला सध्या फक्त गदर चित्रपट आवडतो. यादरम्यान सचिन मीना याला सीमाला पाकिस्तानात पाठवण्याची भीती वाटते का? असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, मला अशी भीती नाही. मला आशा आहे की सीमाला भारतीय नागरिकत्व मिळेल. ती इथेच राहणार. शेवटी सीमा आणि सचिन यांनी लोकांना पाठिंबा देण्याची विनंती करत काहीही खोट्या अफवा पसरवू नका असं आवाहनदेखील केलं आहे.