सध्या सोशल मीडियावर HDFC बँकेतील एका अधिकाऱ्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका कनिष्ठ सहकाऱ्याशी गैरवर्तन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचं बॅंकेने सांगितलं आहे. हा व्हिडीओ एचडीएफसी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन मिटींगदरम्यानचा असल्याचं दिसत आहे. ज्यामध्ये एचडीएफसी बँकेतील एक वरिष्ठ अधिकारी त्याच्या कनिष्ठ सहकाऱ्यावर ओरडताना दिसत आहे. बँकिंग आणि विमा उत्पादने विकू शकत नसल्यामुळे, अधिकारी संतापतो आणि मिटींमध्येच कर्मचाऱ्यावर भडकतो. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अधिकाऱ्याच्या गैरवर्तनाचा व्हिडीओ व्हायरल होताच बॅंकेने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देत संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असून बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिकाऱ्याच्या वर्तनाचा आढावा घेऊन बँक निर्णय घेणार आहे. शिवाय आम्ही कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या कृत्यांसाठी ‘जीरो टोलरेंस पॉलिसी’ वापरतो. तसेच आमच्या सर्व कर्मचार्‍यांशी आम्ही सन्मानाने आणि आदराने वागतो, असं बॅंकेकडून सांगण्यात आलं आहे.

हेही पाहा- नातेवाईकांसह मित्रांनी पैसे मागू नये म्हणून काकांनी वापरली भन्नाट ट्रिक; Viral पोस्ट पाहून नेटकरी म्हणाले, “बरं झालं सांगितलं…”

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक त्याच्या कनिष्ठ सहकाऱ्याला दररोज ७५ विमा पॉलिसी विकण्यास सांगत आहेत. ग्रामीण भागातील ७५ वर्षांवरील बँक ग्राहकांना चुकीची माहिती देऊन आयुर्विमा पॉलिसी विकल्या गेल्याची अनेक प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत. दरम्यान, अनेक बँका त्यांच्या सहयोगी कंपन्यांची विमा उत्पादने त्यांच्या ग्राहकांना विकून पैसे कमावतात.

हेही पाहा- “सडपातळ, गोरी आणि…” अशीच बायको शोधा, ४० वर्षीय व्यक्तीने तहसीलदाराला दिलेला अर्ज व्हायरल, नेटकरी म्हणाले…

सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचार्‍यांना देखील थर्ड पार्टी प्रॉडक्ट विक्रीच्या बाबतीत उच्च व्यवस्थापनाच्या दबावाचा सामना करावा लागतो असं देखील म्हटलं जातं. शिवाय अशी टार्गेट चुकवल्यास त्यांच्यावर कारवाई कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. मात्र, एखादा कर्मचारी अशा उत्पादनांची विक्री करण्यात यशस्वी झाला तर त्याला अनेक प्रकारचे सुविधाही दिल्या जातात. अशातच आता बॅंक अधिकाऱ्याच्या गैरवर्तनाचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी बॅंकेच्या कामकाज पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत असल्याचंही दिसून येत आहेत. तर अनेकांनी त्या अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.