सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजन करणारे तर काही आश्चर्यचकीत करणारे असतात. शिवाय यातील काही व्हिडीओ वादग्रस्त देखील असतात. जे बनवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नेटकरी करत असतात. सध्या असाच एक वादग्रस्त आणि तितकाच धक्कादायक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर पोलिसांनी व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुणांनी चक्क पोलिसांच्या वाहनाच्या बोनेटवर बसून रील बनवल्यांचं दिसत आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ कानपूर येथील असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओत दोन तरुन पोलीस जिप्सीच्या बोनेटवर बसून रील बनवत आहेत. यावेळी या जिप्सीवरील लाईट्सही सुरू असल्याचे दिसत आहे. शिवाय हा व्हिडिओ शेअर करताना या मुलांनी ‘किंग’ असं लिहून शेअर केला होता, शिवाय त्याला जलवा ही जलवा, हे हिंदी गाणं रीलमध्ये ऐकू येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होताच लोकांनी कानपूर पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

हेही पाहा- तुमच्या २ हजाराच्या नोटा वारल्या…; RBI च्या निर्णयानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; Viral मीम्स पाहून पोट धरुन हसाल

@RishabhDixit57 नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने लिहिले की, हा व्हिडिओ कानपूरचा आहे जिथे दोन तरुण पोलीस जीपवर बसून रील बनवत आहेत आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे संपूर्ण व्हिडिओ बनवताना त्यांना कोणीही अडवलं नाही. प्रिया राणा नावाच्या युजरने लिहिले, “कानपूरमध्ये दोन तरुणांनी पोलीस आयुक्तांच्या जीपवर रील बनवली. व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण हा कानपूर हिंसाचारातील आरोपी कल्लू कातिलचा भाऊ आहे.”

हेही पाहा- मोलकरणीचे भयानक कारनामे; एका WhatsApp DP मुळे समोर आली ६० लांखाची चोरी, प्रकरण वाचून व्हाल थक्क

@Akashkchoudhary यूजरने लिहिले, “रीलची क्रेझ आता पोलिसांच्या वाहनांपर्यंत पोहोचली आहे. पोलिसांच्या जीपच्या लाईट लावून रील कशी बनवली जात आहे. खरंच यांचा जलवा आहे. आता कोणावर कारवाई होणार?” आणखी एका यूजरने लिहिले की, कानपूर पोलिसांचे असे कारनामे सतत समोर येत असतात, त्यामुळे ते चर्चेत राहतात.

व्हिडिओमधील पोलिसांच्या जिप्सीचा क्रमांक UP 77 G 0525 असल्याचं दिसत आहे. व्हायरल व्हिडिओवर पोलिसांचे म्हणणे आहे की, जिप्सी काही दिवसांपूर्वी दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये ठेवण्यात आली होती. यादरम्यान या तरुणांनी व्हिडिओ बनवला असण्याची शक्यता आहे. या मुलांची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Story img Loader