Boy Urinates Into Glass: आजच्या काळात दररोज विचित्र घटना घडताना दिसत असतात. रोज काही ना काही नवीन ऐकायला, पाहायला आपल्याला मिळतं. यातील काही घटना इतक्या विचित्र असतात की त्या ऐकून, वाचूनदेखील आपल्याला विश्वास बसत नाही. सध्या अशीच एक घटना चीनमध्ये घडली आहे. या घटनेत लहान मुलाने रेस्ट़ॉरंटमध्ये असलेल्या ग्लासात लघवी केली. नेमकं काय घडलं जाणून घ्या…
चीनमधील हांगझोऊ येथील फुयुआन्जू रेस्टॉरंटमध्ये सगळ्यांचं जेवण सुरू असताना एका दोन वर्षांच्या मुलाने ग्लासमध्ये लघवी केली. तो लहान मुलगा अचानक उभा राहिला, त्याने त्याची पँट खाली केली आणि शौचालयात जाण्याऐवजी घाईघाईने ग्लासातच लघवी केली. त्याच्या आईने मुलाला तसे करण्याची परवानगीदेखील दिली होती आणि त्याच्या कृतीचा बचावही केला.
मुलाने ग्लासामध्येच केली लघवी
FPJच्या वृत्तानुसार रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलेल्या एका व्यक्तीने माध्यमांना सांगितले की, तीन जणांचे कुटुंब तिथे जेवत होते आणि अचानक त्या लहान मुलाने त्याची पँट काढायला सुरुवात केली आणि लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्या मुलाने टेबलावर ठेवलेल्या काचेच्या ग्लासात लघवी केल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला.
तो मुलगा त्याच्या आई आणि दोन वृद्ध नातेवाईकांसोबत जेवत होता, तेव्हा त्याला लघवी करण्याची तीव्र इच्छा झाली. एका वृद्ध सदस्याने लगेच एक कचऱ्याचा डबा आणला आणि मुलाला तिथेच लघवी करण्याचा सल्ला दिला. पण, आईने तो विचार फेटाळून लावला आणि म्हटले की, “त्याला थेट ग्लासमध्ये लघवी करू द्या.”
रेस्टॉरंटने संबंधित ग्लासाची विल्हेवाट लावली
जेव्हा तो मुलगा उभा राहिला, त्याने पॅंट काढली आणि रेस्टॉरंटमधील ग्राहक वापरत असलेल्या ग्लासमध्ये लघवी केली, तेव्हा ग्राहकांना आश्चर्याचा धक्काच बसला. स्थानिक वृत्त माध्यमांनी वृत्त दिले की, रेस्टॉरंटने संबंधित ग्लास लगेच फेकून दिला.
असे कळले की, पालकाने एका कर्मचाऱ्याची माफी मागितली आणि म्हटले, “मुलाला जास्त वेळ सहन करता आलं नाही याबद्दल आम्हाला वाईट वाटते, म्हणून त्याने ग्लासमध्येच लघवी केली.”