सध्याच्या काळात अनेकजण ऑनलाईन शॉपिंग करण्याला पसंती देतात. ऑनलाईन शॉपिंगमुळे जगभरातील लोकांचे जीवन खूप सोपे झाले आहे. कारण आता खरेदीसाठी लोकांना ट्र्रॅफिकचा त्रास सहन करत बाहेर दुकानांमध्ये जावं लागत नाही. घरबसल्या ते हवं ते ऑर्डर करु शकतात. मग त्यामध्ये कपड्यांपासून महागडे दागिने आणि किराणा सामानापर्यंत सर्व काही ऑनलाइन खरेदी करु शकतात. ऑनलाइन शॉपिंगद्वारे खरेदी केलेला माल ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, आजकाल ऑनलाइन शॉपिंगद्वारे मागवलेल्या वस्तूमध्ये काही नागरिकांची फसवणूक झाल्याच्या घटनाही समोर येत आहेत. ऑनलाइन ऑर्डर केलेल्या अनेक वस्तू डिलिव्हरीदरम्यान बदलल्याचही आपण अनेकदा पाहिलं आहे. अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक होत असते. नुकतेच एका महिलेसोबत असाच काही फसवणूकीचा प्रकार उघडकीस आलं आहे.

हेही वाचा- पूर्वी एक किलो सोने ‘इतक्या’ रुपयांत; १९५९ सालचे व्हायरल होत असलेले बिल पाहून तुम्हीही व्हाल थक्क

या घटनेची माहिती एका @badassflowerbby नावाच्या अकाऊंटवरुन करण्यात आली आहे. हे ट्विट करणाऱ्या महिलेने म्हटंल आहे की, तिच्या आईने १२, ०० रुपये किमतीचा इलेक्ट्रिक टूथब्रश ऑर्डर केला होता. जेव्हा तिची ऑर्डर तिच्यापर्यंत पोहोचली तेव्हा पॅकेजमध्ये MDH चाट मसाला बॉक्सची फक्त ४ पॅकेट सापडली, जे पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. शिवाय आपल्या आईने तिला सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक टूथब्रश देणारा विक्रेता निवडला होता असंही तिने ट्विटमध्ये सांगितलं आहे.

हेही वाचा- सिगारेटच्या तलफेसाठी विमानात सर्वांसमोर नग्न होऊन महिलेने क्रू मेंबरला…, संतापजनक घटनेचा Video Viral

विक्रेत्यावर कारवाईची मागणी –

ऑनलाईन फसवणून झालेल्या महिलेला जेव्हा हे पॅकेज देण्यात आले, तेव्हा पॅकेज हलके वाटल्यामुळे संशय आला होता. त्यामुळे तिने त्यानंतर या ऑर्डरचे पैसे दिले नाहीत आणि पॅकेट उघडले तर त्यामध्ये एमडीएच चाट मसाला आढळून आला. या घटनेची माहीती देताना ट्विटर युजरने अॅमेझॉनलाही कंपनीला टॅग करत विक्रेत्यावर त्वरित कारवाई करण्याचे मागणी केली आहे. दरम्यान, महिलेची व्रिकेत्याकडून फसवणूक झाल्याच्या घटनेचा नेटकऱ्यांकडून निषेध करण्यात येत असून या घटनेचे ट्विट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trending news of online shopping fraud woman ordered an electric toothbrush and found chaat spices jap
Show comments