प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती या त्यांच्या साधेपणा आणि प्रेरणादायी भाषणासाठी ओळखल्या जातात. नुकतेच त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्याच्या आहाराविषयी काही खुलासा केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. आहाराविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, परदेशात गेल्यावर तेथील अन्न पदार्थ खायला मला भीती वाटते, म्हणूनच मी बाहेर जाताना बॅग भरुन अन्नपदार्थ बरोबर घेऊन जाते शिवाय यावेळी मी घरुनच चमचा आणि कुकरदेखील घेऊन जाते. त्या मुलाखतीत सांगितात की, मी शुद्ध शाकाहारी आहे, त्यामुळे माझे अन्न मी शक्यतो बरोबर घेऊन जाते. कारण मला काळजी वाटते की, एकच चमचा शाकाहारी आणि मांसाहारी दोन्हीसाठी वापरलेला असू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चमच्याची भीती –

सुधा मूर्ती म्हणाल्या की, मी शुद्ध शाकाहारी असून मी अंडी आणि लसूणही खात नाही. मला अशी भीती आहे की जो चमचा शाकाहारी लोकांना दिला जातो तोच चमचा मांसाहारी लोकांनाही खाण्यासाठी दिला जातो, त्यामुळे मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा मी फक्त शाकाहारी रेस्टॉरंट शोधते किंवा मी खाण्यापिण्याच्या वस्तूंनी भरलेली बॅग बरोबर घेऊन जाते.

हेही पाहा- रेस्टॉरंटमधील महिलेच्या प्लेटमधील पास्ता चिमणीने खाल्ला अन्…, Viral व्हिडीओला मिळाले तब्बल ४१ दशलक्ष व्ह्यूज

परदेशात जाताना ‘या’ गोष्टी बरोबर घेऊन जातात –

सुधा मूर्ती पुढे म्हणतात की, मी जेवणाची खूप आवड आहे पण मी स्वयंपाकी नाही आणि त्यामुळे नारायण मूर्ती नेहमीच फिट राहिले आहेत. परंतु मी खूप छान चहा आणि पोहे बनवते. सुधा मूर्ती यांना मुलाखतीत विचारण्यात आले की, त्या परदेशात गेल्यावर काय खातात, तेव्हा त्या म्हणाल्या, “मी जेव्हा जेव्हा परदेशात जाते तेव्हा खाण्यापिण्याची वस्तूंची एक बॅग बरोबर घेऊन जाते. या बॅगमध्ये २० ते २५ चपात्या आणि भाजलेला रवा घेते, जेणेकरून त्यात गरम पाणी घातल्यावर तो खाण्यासाठी तयार होईल. तसेच मी माझ्यासोबत कुकरही ठेवते. हे सर्व मी माझ्या आजीकडून शिकले आहे. त्यामुळे मी कोणत्या देशाला भेट देत आहे याने काहीही फरक पडत नाही, कारण मी माझे अन्न बरोबर ठेवते.”

नेटकऱ्यांनी थेट ऋषी सुनक यांना विचारले प्रश्न –

सुधा मूर्ती यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींनी तर त्यांचे जावई आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे वेगवेगळ्या प्रकारचे मांस हातात घेतलेले फोटो शेअर करत, “सुनक यांच्याकडे त्यांच्या सासू सुधा मूर्तींसाठी वेगळे चमचे आहेत का?” असे प्रश्न विचारत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trending news one spoon for vegetarians and non vegetarians sudha murthy statement goes viral jap
First published on: 26-07-2023 at 19:07 IST