सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही आपणाला थक्क करणारे आणि अंगावर शहारा आणणारे असतात, तर काही हसून हसून पोट धरायला लावणारे असतात. सध्या असाच एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणं कठीण होऊ शकतं. कारण या डिलीव्हरी बॉयसोबत एक विचित्र अपघात झाला आहे.
अनेक लोकांना वाटतं की, शॉर्टकट वापरल्यामुळे कमी कष्टात जास्त आणि कमी वेळात काम करता येतं. एका डिलिव्हरी बॉयनेदेखील असाच विचार केला होता. कदाचित म्हणूनच लांब रस्ताने जाण्यापेक्षा त्याने एक शॉर्टकट वापरुन नाला ओलांडून फूड डिलीव्हरी करण्याचा निर्णय घेतला होता. पण या शॉर्टकटमुळे एका नव्या संकटाला सामोरं कसं जावं लागलं आहे, ते तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल.
शॉर्टकट नडला पिझ्झा थेट नाल्यात पडला-
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एका डिलिव्हरी बॉयच्या पाठीवर बॅग अडकवून फू़ड डिलीव्हरी पोहोचवण्यासाठी जाताना दिसत आहे. यावेळी तो एका नाल्याजवळ पोहोचतो. तो इकडे तिकडे पाहतो आणि नाल्यावरुन उडी मारून नाला ओलांडण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याची बॅग थोडी उघडलेली दिसत आहे. त्यामुळे डिलीव्हरी बॉयने उडी मारताच ती पूर्णपणे उघडली जाते आणि बॅगमधील पिझ्झा खाली पडतो. त्यानंतर डिलीव्हरी बॉय स्वत:चं डोके धरून उभा राहिल्याचंही पाहायला मिळत आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
हा व्हिडिओ failarmy नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १.२ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी लाईक केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने, “नाल्याच्या पाण्यातील पिझ्झा” असं लिहिलं आहे.