सोशल मीडियावर मुलं आणि पालकांशी सबंधित अनेक पोस्ट व्हायरल होत असतात. यामधील काही पोस्ट भावनिक असतात तर काही मजेशीर. पालक आपल्या मुलांच्या लहानपणापासून ती मोठी होईपर्यंतच्या अनेक अपेक्षा, गरजा पुर्ण करत असतात. शिवाय तिच मुलं मोठी झाली की त्यांच्याकडून पालक काही अपेक्षा ठेवतात. पण आपण मुलांची जशी काळजी घेतली त्याच पद्धतीने त्यांनी देखील आपली काळजी घ्यावी अशी पालकांची अपेक्षा असते. शिवाय मुलांनी जर आपण सांगितलेली एखादी गोष्ट ऐकली नाही तर अनेक पालक नाराज होतात. असे किस्से अनेक कुटुंबांमध्ये घडतात.
सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात तर अनेक पालक मुलांशी भाडणं झाल्यानंतर व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून मनातील राग व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. शिवाय ते स्टेटस मुलांसह इतर अनेक लोक बघतात ज्यामुळे स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तीचं मुलाशी काहीतरी बिनसल्यांच लोकांच्या लक्षात येतं. सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका मुलीने तिच्या आईने ठेवलेला व्हॉट्सअॅप स्टेटस ट्विटरवर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिने सांगितलं आहे की, आईसोबत भांडण झाले आणि काही मिनिटांनी आईने वृद्धाश्रमाचा हा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला.
हेही पाहा- अंडी शिजवायला गेली अन् संपुर्ण चेहरा… महिलेचा विचित्र अपघात होतोय Viral; नेमकं घडलं काय?
@diimplegirll नावाच्या मुलीने तिच्या आईचा व्हॉट्सअॅप स्टेटसचा स्क्रीनशॉट शेअर करताच अनेक नेटकऱ्यांनी आपापले अनुभव सांगायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोत अनेक वयस्कर लोक दिसत आहेत. फोटोच्या वर लिहिले आहे, “मुलांसोबत बळजबरीने राहण्यापेक्षा वृद्धाश्रमात राहणे चांगले.” आता ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही पाहा- चीनचे अनोखे ऑपरेशन! खोदणार तब्बल १० हजार मीटर खोल छिद्र; यामागचे कारण जाणून व्हाल थक्क
आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे तर ४ हजारांहून अधिक लोकांनी ती लाईक केली आहे. तर अनेकजण यावर मजेशीर कमेंट देखील करत आहेत. एका यूजरने लिहिले, अशी भांडण झाल्यानंतर माझ्या घरी बागबानची गाणी सुरु होतात. दुसर्या यूजरने लिहिले, “मम्मीचे ड्रामा” तर तिसर्याने “ती एक आई आहे, ती काहीही करू शकते.” चौथ्या वापरकर्त्याने डीपी काढला नाही हे चांगलं झालं असं म्हटलं आहे.