सध्या अनेक व्यावसायिक आयकर रिटर्न भरण्याची घाई करत असतानाच, फ्लिपकार्टमधील एका कर्मचाऱ्याने कमाई आणि खर्च या दोन्ही गोष्टींवर आकारल्या जाणाऱ्या कराबाबत निराशा व्यक्त केली आहे. यासाठी त्याने एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्याने लिहिलं आहे, “आज मी ५ हजार रुपये कमावले ज्यामधील ३० टक्के सरकारला कर म्हणून द्यायचे आहेत. मी उरलेल्या पैशातून काही कॅफिनयुक्त पेये घेण्याचा विचार केला तर त्यासाठी मला २८ टक्के कर द्यावा लागला,” हे ट्विट संचित गोयल नावाच्या कर्मचाऱ्याने केलं आहे. त्याच्या लिंक्डइनवरील त्याच्या बायोनुसार बंगळुरूमधील ई-टेलर येथे श्रेणी व्यवस्थापक म्हणून तो कार्यरत आहे. संचितने आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिलं आहे “मला समजले की, मी माझ्या कमाईमधील ५० टक्क्यांहून अधिक रक्कम सरकारला देण्यासाठी दिवसाचे १२ तास काम करतो.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संचितने आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये, २० रुपयांच्या चॉकलेटवरही सरकार २७.५ टक्के कर आकारते असं लिहिलं आहे. संचितचे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे आतापर्यंत ५ लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे तर अनेकांनी ते लाईकदेखील केले आहे. शिवाय या कर्मचाऱ्याने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्याचंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. @satishv1024 नावाच्या युजरने कमेंटमध्ये लिहंल आहे, “आणि तेव्हा तुमचे रक्त उसळते, जेव्हा तुम्हाला कळते की करातील मोठा हिस्सा पायाभूत सुविधा निर्माण करण्याऐवजी सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात, निवृत्तीवेतनात आणि अनावश्यक गोष्टींमध्ये जात आहे.”

हेही वाचा- ”तुम्ही स्वत: कधी वेळेवर…”, उशीरा ऑफिसला येणाऱ्या कर्मचाऱ्याला नोटीस पाठवणे अधिकऱ्याला पडलं महागात!

तर आणखी एका ट्विटर युजरने लिहिलं की, जर तुम्हाला कॅसिनो खेळायचा असेल तर हे आणखी वाईट आहे.” यावर संचितने रिप्लाय दिला आहे, त्याने लिहिलं आहे, “मला माहित आहे. संपूर्ण जोखीम माझी आहे, तरीही मला कर भरावा लागेल. शिवाय मी जिंकलो तर मला कर भरावा लागतो, मात्र मी हरलो तर तो सर्व लॉस माझा आहे.” तर ऑनलाइन गेमिंग कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांकडून गोळा केलेल्या निधीवर २८ टक्के कर लावण्याच्या केंद्राच्या निर्णयाचा तो संदर्भ देत आहे.

‘शार्क टँक इंडिया’ फेम आणि उद्योजक अश्नीर ग्रोव्हर यांनीही देशातील उच्च आयकर दर आणि ऑनलाइन गेमिंगवर नव्याने लागू केलेला कर या दोन्हींवर जोरदार टीका केली होती. ग्रोव्हरने याबाबत एक ट्विट केले होते, ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, “करदाते देशाला देणगी देत ​​आहेत. त्यांना कोणताही लाभ मिळत नाही.” “तुम्ही मला एक गोष्ट सांगा, मी १० रुपये कमावणार आणि ४ रुपये सरकार ठेवणार हे जाणून तुम्ही १२ महिन्यांपैकी पाच महिने सरकारसाठी काम करता. तुमच्या आयुष्यात आता किती वर्षे आहेत?”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trending news working 12 hours a day to give 50 percent of the income to the government tweet of an employee in bangalore viral jap