अनेकदा आपण काही गोष्टी क्षुल्लक आणि निरुपयोगी समजून फेकून देतो. मात्र, काही हुशार आणि योग्य पारख असणारे लोक अशा वस्तूंचा योग्य वापर करतात, ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. सध्या अशाच एका व्यक्तीने जुन्या खुर्चीची योग्य पारख केल्याने तो लखपती झाला आहे. हो कारण केवळ ४ हजारात खरेदी केलेली खुर्ची त्यांने तब्बल ८२ लाखांना विकली आहे. कदाचित तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. लाखो रुपयांना खुर्ची विकणाऱ्या व्यक्तीचं नाव जस्टिन मिलर असं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जीर्ण झालेली खुर्ची खरेदी केली –

मिलरला फेसबुक मार्केटप्लेसवर एक चामड्याची जुनी खुर्ची सापडली. ती साधी दिसणारी खुर्ची त्यांने ५० डॉलर म्हणजेच ४ हजार रुपयांत खरेदी केली. मिलर हा सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आहे. मिलरने खुर्ची ४ हजारांना विकत घेतली आणि लिलावात ती तब्बल २ हजार पट जास्त किंमतीने म्हणजेत ८२ लाखांना विकली. मिलरला या खुर्चीचे महत्त्व समजले होते. त्यामुळे त्याला इतका मोठा फायदा झाला. बिझनेस इनसाइडरला मिलरने सांगितले की, “मी कदाचित अँटिक रोड शोचा प्रत्येक भाग पाहिला आहे.”

एका नजरेत पारखली खुर्ची –

हेही पाहा- असा जुगाड असेल तर धान्य दळण्यासाठी गिरणीत जायची गरजच काय? IAS अधिकाऱ्याने शेअर केलेला भन्नाट Video पाहाच

मिलर म्हणाला, “मला जुन्या वस्तू चांगल्या प्रकारे ओळखता येतात, मी काही तज्ञ नाही, पण माझ्या डोळ्यांनी या खुर्ची पारखली होती. ती खरोखर चांगली खुर्ची दिसते” लिलावासाठी त्याने सोथबीज या फाइन आर्ट कंपनीशी संपर्क साधला. सूचीनुसार, त्याला त्याला खुर्चीचे २५ ते ४० लाख मिळतील मिळतील अशी अपेक्षा होती, परंतु लिलावाच्या शेवटी मिळालेल्या किंमतीमुळे आश्चर्यचकीत झाला. कारण या लिलावात तब्बल ८२ लाख रुपये मिळाले.

हेही वाचा- “कष्टाने पैसा, पैशाने इज्जत आणि…” दारुच्या दुकानावर लिहिलेला ‘तो’ मजकूर तुफान Viral; नेटकरी म्हणाले “उद्यापासून प्यायला…”

मिलरने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, खुर्चीचा लिलाव २३ लाखापासून ७० लाखांपर्यंत पोहोचला आणि शेवटी खरेदीदाराने ती ८२ लाखांना विकत घेतली. शिवाय ही खुर्ची व्यवस्थित करण्यासाठी मी अडीच लाख खर्च केले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trending news worn out chair bought for rs 4000 sold for rs 82 lakh learn how an old chair became a millionaire jap
Show comments