आजकाल अनेकजण घरात लागणारे सामान ऑनलाईन ऑर्डर करतात. मात्र तरीही तुमच्यापैकी अनेकांनी घरच्यांनी लिहून दिलेल्या यादीतील किराणा सामान दुकानदाराकडून घेऊन घरी नेण्याची काम केलं असेल यात शंका नाही. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की, किराणा सामानाची ऑर्डर देण्यासाठी कोणीतरी त्या वस्तूच्या नावाऐवजी त्यांचे चित्र बनवले असेल. कदाचित तुम्हाला हे ऐकायला विचित्र वाटेल. पण सध्या सोशल मीडियावर १६ व्या शतकातील हस्तलिखित किराणा मालाची व्हायरल होत आहे. ज्यामध्ये किराणा मालाच्या वस्तूंची चित्रे बनवण्यात आली आहेत. सध्या या अनोख्या सामानाच्या यादीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

…म्हणून काढावे लागले चित्र –

ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या फोटोत एका महान इटालियन कलाकार मायकेलएंजेलो यांनी बनवलेली हस्तलिखित यादी दिसत आहे. या यादीत मासे आणि रोटी सोबतच 15 किराणा मालाच्या नावासोबत त्यांचे चित्र देखील बनवण्यात आली आहेत. मायकेलएंजेलोने मासे, ब्रेड, सूप, टॉर्टेली आणि वाइनचे चित्र काढले आहे. या वस्तूंची चित्रे काढण्यामागे एक खास कारण होते, ते म्हणजे त्यांचा नोकर अशिक्षित होता, त्याला लिहिता वाचता येत नसल्याने मायकेल हे किराणा मालाची चित्रांसह यादी बनवत होते.

हेही वाचा – कुत्रा सतत जवळ येतो म्हणून नवऱ्याने केलं विचित्र कृत्य, बायकोने CCTV तपासले असता समोर आलं धक्कादायक वास्तव

संग्रहालयात ठेवली आहे यादी –

ही किराणा मालाची यादी कासा बुओनारोटी येथील फ्लॉरेन्स संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. ही यादी पाहण्यासाठी संग्रहालयात लोक लावतायत रांगा लावतात. या यादीचा दुर्मिळ फोटो Massimo नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. शेअर केल्यापासून तो सुमारे एक लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी या फोटोवर कमेंटही केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “संशोधकांनी बहुतेक अस्पष्ट इटालियन लेखनाचा उलगडा केला आणि त्यांना आढळले की मायकेलएंजेलोची प्रणाली आधुनिक ऑनलाइन किराणा वितरण सेवांसारखीच आहे.” तर दुसर्‍याने लिहिले, “कलात्मकतेच्या या पातळीला कोणी हरवू शकत नाही.” तिसऱ्याने लिहिले, “आजकाल आपण यासाठी इमोजी वापरतो.”