जगभरातील विमान प्रवाशांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरुन फ्लाइटमध्ये भांडण होणं आता सामान्य झाले आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये विमान प्रवासादरम्यान प्रवाशांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळतं. शिवाय असे व्हिडीओ पाहून अनेकदा विमानातील अन्य प्रवासी घाबरुन जातात. सध्या क्रोएशियाहून लंडनला जाणाऱ्या रायनएअरच्या विमानातील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या फ्लाइटमधील एका व्यक्तीने असं काही कृत्य केलं आहे की, ज्यामुळे विमानातील इतर प्रवासी घाबरल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विमानाचं दार उघडा, असं ओरडत होता प्रवासी –

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक प्रवासी आपल्या सीटवरून उठतो आणि दरवाजा उघडा असे ओरडत गेटकडे पळत जाताना दिसत आहे. फ्लाइट टेक ऑफ होण्यापूर्वीच हा प्रवासी अचानक उठतो आणि गेटच्या दिशेने पळू लागतो. या प्रवाशाला विमानाच्या बाहेर जायचं होतं म्हणून तो दरवाजा उघडा असे ओरडायला सुरुवात करतो. व्हिडिओमध्ये हा प्रवासी खूप संतापल्याचं दिसत आहे. एअर होस्टेस त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते, परंतु तो तिच्या शेजारुन पळून जातो, हा प्रवासी पुढे जाताच इतर दोन प्रवासी येतात आणि त्याला खाली पाडतात आणि शांत करण्याचा प्रयत्न करतात.

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

या व्यक्तीने विमानात गोंधळ घातल्याचा व्हिडीओ अन्य प्रवाशांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केला होता, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ८.९ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेक यूजर्स व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे, “मी या फ्लाइटमध्ये होतो, त्यावेळी तो प्रवासी खूप भावूक झाली होती” तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, चांगली बाब ही आहे की, ती परिस्थिती हाताळू शकणारे काही लोक विमानात होते. दरम्यान, मागील काही दिवसांपासून विमानातील भांडणाचे किंवा विमानाचे दरवाजे अचानक उघडल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून ही चिंतेची बाब असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trending open the door shouts passenger as flight takes off video of ryanair flight goes viral jap