‘जैसी करणी वैसी भरणी’ म्हणजेच आपण जसं कृत्य करतो तसंच त्याचं फळं मिळतं, असं म्हटलं जातं. अनेकदा लोक दुसऱ्याचं वाईट करायला जातात आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते. याला आपण जसे कर्म तसे फळ असे म्हणतो. याचेच एक ताजे उदाहरण समोर आले आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका रस्त्यावरुन जाणाऱ्या मुलीला त्रास देणाऱ्या तरुणाला काही प्रवाशांनी चांगला धडा शिकवला आहे.
आपल्या देशात महिलांसोबत होणाऱ्या छेडछाड, बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतच्या घटना आपण पाहत असतो. यातील काही काही घटना अशा असतात, ज्या पाहून आपणला धक्का बसतो. शिवाय महिलांना त्रास देणाऱ्यांचा संताप येतो. शिवाय महिलांना त्रास देणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी असा विचार मनात येतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरी समादान व्यक्त करत आहेत. कारण या व्हिडीओमध्ये रस्त्यावरुन जाणाऱ्या मुलीला एकटं पाहून तिची छेड काढणाऱ्या एका नराधमाला लोकांनी चोप दिला आहे. जे पाहून नेटकरी जसे कर्म तसेच फळ मिळतं याचं उदाहरण पाहायला मिळाल्याचं म्हणत आहेत.
हेही वाचा- किळसवाणा प्रकार! खाद्यपदार्थात आढळले माणसाचे बोट, महिलेने रेस्टॉरंटविरोधात दाखल केला गुन्हा
मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ @cctvidiots नावाच्या एक्स (ट्विटरवर) शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मुलगी चालत असताना एक तरुण तिची छेड काढतो, तिला पकडण्याचा प्रयत्न करतो. यावेळी सुदैवाने तिथे एक बस येते. बसमधील लोक या मुलीची छेड काढणाऱ्याला छडा शिकवतात. ज्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ९३ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये “झटपट कर्माचे फळ” असं लिहिलं आहे.