विमानाचा प्रवास म्हणजे सर्व सोयीनियुक्त असा प्रवास असतो. शिवाय विमानात दिल्या जाणाऱ्या अनेक सुविधा लोकांना आवडतात. त्यामुळे अनेक लोकं विमान प्रवास करताना निश्चिंत होऊन प्रवास करत असतात. मात्र, सध्या अशी एक घटना उघडकीस आली आहे ज्यामुळे प्रवाशांनी विमामात मिळणाऱ्या जेवणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली आहे. कारण, एका महिलेला विमान प्रवासादरम्यान जेवणामध्ये चक्क दात आढळल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही पाहा- ‘आजी जाऊ नको ना…’; बाहेर जाणाऱ्या मालकिणीला थांबण्याची विनंती करणाऱ्या कुत्र्याचा भावनिक Video पाहिलात का?

या घटनेबाबत स्वत: विमान कंपनीला प्रवाशाची माफी मागावी लागली आहे. ब्रिटिश एअरवेजच्या फ्लाइट क्रमांक BA107 मधील महिला प्रवाशाने सोशल मीडियावर फोटो ट्विट करत ही घटना उघडकीस आणली आहे. या महिलेने ट्विटमध्ये आपल्या जेवणामध्ये दात सापडल्याचं सांगितलं.

ही महिला प्रवासी लंडनहून दुबईला जात असताना तिच्यासोबत हा प्रकार घडला. महिलेने @Ghada नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन जेवणात दात सापडल्याच्या घटनेचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये जेवणासोबत रुमालात गुंडाळलेला एक दात असल्याचं दिसतं आहे. दरम्यान, महिलेने ट्विटमध्ये लिहलं आहे की, ‘मी २५ ऑक्टोबरला लंडनहून दुबईला जात होते. या प्रवासादरम्यान मला जेवनामध्ये हा दात सापडला. शिवाय माझे सर्व दात व्यवस्थित आहेत. मी तुमच्या कॉल सेंटरशी संपर्क साधला पण कललाही प्रतिसाद मिळाला नाही.’

महिला प्रवाशाने केलेल्या या ट्विटची दखल खुद्द विमान कंपनीने घेतली. कंपनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘हे जाणून आम्हाला खूप दुःख झाले. याबाबत आमत्या केबिनमध्ये उपलब्ध अधिकाऱ्यांना, तुमच्याशी संपर्क करण्यासाठी काही माहिती दिली आहे का? शिवाय सुरक्षिततेसाठी आम्हाला डायरेक्ट मेसेज करा असं उत्तर कंपनीने या महिलेला दिलं आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर नेटकरी मात्र चांगलेच भडकले असून अनेकांनी तर असला प्रकार विमानामध्ये घडतो? आणि विमानामध्ये असलं जेवण भेटतं यावर आमचा विश्वास बसतं नसल्याचं म्हटलं आहे.