बिहारमध्ये नुकतीच एक मोठी दुर्घटना घडली होती, ज्यामध्ये भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीवर बांधण्यात येत असलेला पूल रविवारी ( ४ जून ) सायंकाळी कोसळला. या घटनेची देशभरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती. शिवाय हा पूल कोसळल्यानंतर अनेकांनी बिहार सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. या पुलाची बातमी लोकांच्या लक्षातून जायच्या आधीच बिहारमधील आणखी एका घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये एका ट्रकची रस्त्यात रुतल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील पाटणा येथील आगमकुआन-शीतला माता मंदिर रस्त्याजवळून एक ट्रक जात असतानाच अचानक रस्ता खचला, ज्यामुळे ट्रक जागीच अडकला. या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही घटना घडताच रस्त्यावरील वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली होती. शिवाय ट्रक रस्त्याच्या मधोमध अडकल्यामुळे कडाक्याच्या उन्हात अनेकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.

हेही पाहा- “तुमच्या झोपेसाठी रस्त्याची सुरक्षा खाटेवर…?” वाहतूक पोलिसांनी शेअर केलेला मजेशीर Video व्हायरल

शीतला अष्टमीनंतर शीतला माता मंदिरात जाणाऱ्या अनेक भाविकांना या अपघातामुळे त्रास सहन करावा लागला. दरम्यान, या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यावर काही नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत, तर काही लोकांनी असे रस्तेच अपघाताला कारणीभूत ठरतात असं म्हटलं आहे.

हेही पाहा- “मजूरांचा डोळा…” अनोख्या पद्धतीने तांदळाची क्वालिटी चेक करणाऱ्या महिलेचा Video पाहून व्हाल थक्क

एका यूजरने लिहिलं आहे “बिहार में का बा….” तर दुसऱ्याने लिहिले, “एवढाही मऊ रस्ता बनवायचा नव्हता.” काही लोकांना ही घटना विनोदी अस्लयाचं म्हटलं आहे, तर काहींनी रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत बिहार सरकारवर टीका केली आहे. एका नेटकऱ्याने “ग्रेट डेव्हलपमेंट” अशी कमेंट करत हे बिहार सरकारच्या नाकर्तेपणाच लक्षण असल्याचंही म्हटलं आहे. दरम्यान, या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला काढला आणि वाहतूक सुरळीत केली.