आपल्यापैकी अनेकांनी झोपेत चालण्याची सवय असलेल्या व्यक्तीबद्दल नक्कीच ऐकले असेल किंवा त्यांना भेटलाही असाल. परंतु तुम्ही कधी एखादी व्यक्ती झोपेत चालता चालता एका शहरातून दुसऱ्या शहरात गेल्याचं ऐकलं आहे का? कदाचित तुमचं उत्तर नाही असं असू शकतं. पण सध्या अशा एका घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे, जी १९८७ साली घडली होती. महत्वाची बाब म्हणजे ही घटना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाईटवर शेअर करण्यात आली आहे.

झोपेत चालत गेला दुसऱ्या शहरात –

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
Boys dance on nach re mora ambyahya vanat song at school get together function funny video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गेट दुगेदरला शाळेतल्या जुन्या मित्रांनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Kurla Bus Accident
Kurla Bus Accident : पहिल्या नोकरीचा पहिलाच दिवस, अन् घात झाला…; घरी परतताना १९ वर्षीय तरूणीला मृत्यूने गाठलं

स्लीपवॉकिंग ही एक वैद्यकीय स्थिती आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला झोपेत चालण्याची सवय असते. ६ एप्रिल १९८७ रोजी अमेरिकेतील इंडियानामधील पेरू येथे एका रेल्वे ट्रॅकजवळ मायकल डिक्सन नावाचा ११ वर्षांचा मुलगा पायात चप्पल नसलेल्या अवस्थेत सापडला होता, शिवाय त्याने नाईट सूट घातला होता. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने या मुलाला पाहिले आणि त्याने पोलिसांना बोलावले आणि मायकल ज्या अवस्थेत सापडला होता त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मायकलला कुठे राहतो असे विचारले असता तो पेरूचा नसल्याचे स्पष्ट झाले. शिवाय तो डेनविले इथे राहत होता, जे ठिकाण पेरूपासून १६० किलोमीटरहून लांब होते.

हेही पाहा- “अभ्यास करा रे…” विद्यार्थ्यांचा वर्गात अनोखा पराक्रम, दोन मित्रांच लावलं लग्न, व्हायरल VIDEO पाहून पोट धरुन हसाल

स्लीपवॉकिंगच्या घटनेच्या रात्री मायकलला त्याच्या आईने रात्री अंथरुणावर झोपलेला पाहिला होता. त्यामुळे तो घरात झोपला आहे असं आईला वाटलं. मात्र, जेव्हा पोलिसांचा फोन आला आणि त्यांनी मायकल विचित्र अवस्थेत सापडला असल्याचं सांगितलं तेव्हा आईला धक्का बसला, यावेळी तिने घरात जाऊन मायकल झोपलेल्या जागेवर आहे का तपासलं असता तो खरंच तिथे नव्हता. मायकलने इतक्या लांब झोपेत कसा गेला? तर तो झोपेत त्याच्या घराजवळच्या स्टेशनवर एका मालगाडीत चढला. कारण त्याचे घर रेल्वेस्टेशनजवळ होते, त्यामुळे तो ट्रेनमध्ये झोपला. मात्र, मायकलने मियामी काउंटी डिपार्टमेंट ऑफ वेल्फेअरमधील केसवर्करला सांगितले की, त्याला तो ट्रेनमध्ये बसल्याचे आठवत नसल्याचं सांगितलं. शिवाय यावेळी त्याच्या पायावर खूप जखमा देखील झाल्याचं दिसत होतं.

घटनेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

हे प्रकरण मीडियामध्ये चर्चेत आल्यानंतर मायकेल डिक्सनच्या या स्लीपवॉकिंग प्रकरणाचा दोन वर्षांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला. बॉल स्टेट डेली न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात मायकेलच्या आईने सांगितले, “मायकल स्लीपवॉक करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती, त्याला वारंवार विचित्र स्वप्न पडायची आणि तो नेहमी झोपेत चालायचा, पण तो याआधी कधीही झोपेत चालताना बाहेर गेला नव्हता.”

Story img Loader