सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ आपणाला हसवतात, तर काही भावूक करतात. तर काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपणाला त्यातून काहीतरी धडा मिळतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या परिस्थितीला कधीच नावे ठेवणार नाही. अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात. मात्र, आपल्या आजुबाजूला काही लोक असे असतात की, त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला आपण खूप सुखी असल्याची जाणीव होते. हो कारण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांची परिस्थिती गरीब असतेच, शिवाय कष्ट करुन जगायचं म्हटलं तरीही त्यांना ते कष्ट करता येत नाहीत. कारण नियतीने त्यांना अपंग जन्माला घातलेलं असतं.
मात्र, कोणत्याही परिस्थितीवर मात कशी करता येऊ शकते, हे सांगणारा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही या व्हिडीओतील व्यक्तीच्या जिद्दीचे नक्कीच कौतुक कराल आणि तुम्हाला त्याच्या परिस्थितीची किवही येईल. खरं तर, या जगात असे बरेच लोक आहेत जे आपल्या आयुष्याबद्दल दररोज तक्रार करत असतात. अशांसाठी हा व्हिडीओ एक धडा आहे. कारण व्हिडिओमध्ये एक व्यक्ती खरोखरच जगण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील भारावून जाल यात शंका नाही.
जिद्दीला सलाम –
या अपंग व्यक्तीचा व्हिडीओ ‘जिंदगी गुलजार है’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अपंग व्यक्ती कामाच्या ठिकाणी संघर्ष करताना दिसत आहे. या व्यक्तीला स्वत:च्या पायावर उभे राहून चालतादेखील येत नाही, परंतु तरीही तो हाताच्या साह्याने काम करताना दिसत आहे. शिवाय यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हसू असल्याचंही पाहायला मिळत आहे. व्हिडीओतील व्यक्तीच्या डोक्यावर सिमेंटची पाटी असतानाही तो पायऱ्यांवर ती घेऊन जात आहे. त्याच्या या कष्टाचा आणि जिद्दीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी भारावून गेले आहेत. तर अनेकजण त्याच्या जिद्दीचे कौतुक करत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया –
या व्यक्तीच्या प्रामाणिक कष्टाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिवा आहे. तर अनेक नेटकरी या व्हिडिओवर कमेंट करून दिव्यांग व्यक्तीच्या धैर्याला सलाम करत आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिलं, “बघा, भावाच्या चेहऱ्यावर अजूनही हसू आहे, लोकांकडे आलिशान बंगले आहेत, तरीही ते रडत आहेत. हेच जीवनाचे रडगाणे आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “आयुष्यात जो संघर्ष करतो तो काहीही साध्य करू शकतो.”