प्राणी, पक्षी, राजकीय नेते दैवदेवता यांची हुबेहूब चित्र काढणारी वेगवेगळे चित्रकार आपण पाहिलेत. पण स्वतःचंच चित्र रेखाटणारा हत्ती तुम्ही कधी पाहिलाय का? होय, हे खरंय. कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही म्हणाल हत्ती कसा काय बरं स्वतःचे चित्र रेखाटू शकतो. तर मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच. या व्हायरल व्हिडीओमध्ये हत्तीनं इतकं सुंदर चित्र रेखाटलंय की, ते पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात शेअर झालेल्या या व्हिडीओत एका मोकळ्या मैदानात उभा असलेला एक हत्ती दिसतोय. त्याच्या समोर एक कॅनव्हास बोर्ड आणि त्यावर एक पांढऱ्या रंगाचा पेपर लावलेला दिसून येतोय. या व्हिडीओमधल्या हत्तीने आपल्या सोंडेत पेटिंगचा ब्रश पकडत पांढऱ्या पेपरवर आपलं स्वतःचं चित्र रेखाटताना दिसून येतोय.

आणखी वाचा : बकरी आणि गाढवाच्या मैत्रीचा VIDEO VIRAL, झाडाची पानं खाण्यासाठी केला असा जुगाड…

सुरूवातीला हा हत्ती पेपरवर आधी सोंड काढतो आणि नंतर तो शरीराचा संपूर्ण भाग काढतो. त्यानंतर तो पाय काढण्यासाठी दोन समांतर रेषा रेखाटतो. असं एक एक करत तो आपलं चित्र पूर्ण करतो. त्यानंतर चित्रात हत्तीने त्याच्या सोंडेत गुलाबाचं फुल देखील पकडलेलं दाखवलंय. इतकंय काय तर आपलं चित्र पूर्ण झाल्यानंतर एखाद्या प्रसिद्ध चित्रकाराप्रमाणेच हा हत्ती सुद्दा पेंटिंगवर आपली सही करताना दिसून येतोय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : जेव्हा म्हशीला राग येतो…, असा केला हल्ला की सारेच जण गेटमधून बाहेर पडले

या व्हिडीओमध्ये हत्ती चित्र काढत असताना अगदी मन लावून पेटिंग करताना दिसून येतोय. त्याचं संपूर्ण लक्ष त्या पेटिंगवरील चित्राकडेच असल्याचं दिसून येतोय. हा हत्ती हुबेहुब एका परफेक्ट पेंटर प्रमाणेच सोंडेत पेटिंग ब्रश फिरवताना दिसून येतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी प्रवीण अंगुसामी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलाय. एका हत्तीने केलेली ही परफेक्ट पेटिंग पाहून सारेच जण थक्क झाले आहेत. हत्तीचं हे टॅलेंट पाहून सारेच जण हत्तीचं कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह मात्र लोकांना आवरता येत नाही. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की, आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ६९ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १० हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कंटेनरमधून थेट ट्रकच्या छतावर पोहोचली ही गाय, पुढे जे झालं ते पाहून हसू आवरणार नाही

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : गुलाबी थंडीत ब्लँकेटच्या आत मुलगी जे करत होती ते पाहून आई हैराण झाली, पाहा हा VIRAL VIDEO

प्रत्येकजण हा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झाला आहे. हा व्हिडीओला पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काही युजर्सनी या व्हिडीओखाली कमेंट करत हत्तीच्या टॅलेंटचं कौतुक केलंय. तर काही युजर्सनी कमेंट करताना हत्तीला प्रशिक्षण दिलेलं असणार असा तर्क लावलाय. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “हत्ती खूप स्मार्ट असतात” आणि ते खरे देखील आहे. कारण या हत्तीने आपल्या चित्रातून ते सिद्ध केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trending the elephant made its painting in the perfect way this viral video will surprise you prp